आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मुनी प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागली 11 कोटींची बोली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जैन समाजातील 5 लोकांना एका अध्यात्मिक संताच्या अंंत्यसंस्कारासाठी तब्बल 11 कोटी रुपये दिले आहेत. मुनी आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी यांचे रविवारी (25 सप्टेंबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. एखाद्या अध्यात्मिक गुरुच्या अंत्य संस्कारासाठी एवढ्या मोठ्या रकमेेची बोली लागल्याची ही कदाचित पहिली घटना असावी.

मिळालेली माहिती अशी की, प्रेमसूरजीस्वाजी यांचे मृत्यूसमयी 97 वर्षे वय होते. या वयात त्यांना अनेक व्याधींंनी ग्रासले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंंतु, त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. त्यातच रविवारी प्रेमसूरजीस्वाजी यांचे निधन झाले. प्रेमसूरजीस्वाजी यांनी अनेक परिवारांना शांतीचा संदेश दिला. हजारो अनुयायींंना दीक्षा दिली.
अशी लागली बोली...
वाल्केश्व येथील बाबू पन्नालाल जैन मंदिरात रविवारी अवघ्या तीन तासांत पाच जैन बांधवांनी प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्ययात्रेसाठी 11 कोटी 11 लाख 11 हजार अकराशे 11 रुपये दान केले. त्यात एक डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन बिझनेसमनचा समावेश आहे. केले. दरम्यान, जैन मुनी यांच्या अंत्यविधी पार पाडण्यासाठी बोली देखील लावली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यविधीसाठी 300 किलो चंंदन...
बातम्या आणखी आहेत...