आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जैन मुनींच्या अंत्यसंस्कारासाठी लागली होती 11 कोटींची बोली, अंत्यविधीसाठी 300 किलो चंदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील पाच जैन बांधव एका आध्यात्मिक गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले होते. त्यांनी अंत्यसंस्कारासाठी तब्बल 11 कोटी रुपये दिले होते. मुनी आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी यांचे मागील वर्षी 25 सप्टेंबरला सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले होते. एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी एवढ्या मोठ्या रकमेची बोली लावल्याची कदाचित ही पहिली घटना असावी.

हजारो अनुयायींना दीक्षा होती दिली...
- प्रेमसूरजीस्वाजी यांचे मृत्यूसमयी 97 वर्षे वय होते. या वयात त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते.
- मुनींवर उपचार सुरु होते. परंतु, त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती.
- प्रेमसूरजीस्वाजी यांनी अनेक परिवारांना शांतीचा संदेश दिला. हजारो अनुयायींना दीक्षा दिली होती.

अशी लागली बोली...
- वाल्केश्व येथील बाबू पन्नालाल जैन मंदिरात रविवारी अवघ्या तीन तासांत पाच जैन बांधवांनी प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्ययात्रेसाठी 11 कोटी 11 लाख 11 हजार अकराशे 11 रुपये दान केले होते.  
- त्यात एक डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन बिझनेसमनचा समावेश होता.
- दरम्यान, जैन मुनी यांच्या अंत्यविधी पार पाडण्यासाठी बोली देखील लावण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यविधीसाठी 300 किलो चंदन...
बातम्या आणखी आहेत...