आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rs 7000 cr Project To Add More Lanes To Mumbai pune Expressway

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार 14 पदरी, अंतर सहा किमीने कमी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास आता आणखी सुरक्षित आणि सुसाट होणार आहे. वाहनांची वाढती संख्या, खोपोली ते खंडाळादरम्यान घाटमाथ्यावर होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी एक्स्प्रेस वे 14 पदरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एक्स्प्रेस वेवर नव्याने उभारण्यात येणा-या आठ पदरी मार्गावर कोणतेही टोलनाके उभारणार नाही. हा संपूर्ण प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर बांधणार आहे. मात्र त्याचा खर्च वाहनचालकांकडून वसूल करणार नसल्याचेही शिंदे म्हणाले. सध्या असलेल्या सहा पदरी मार्गावरून खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत 12 किलोमीटर लांबीचा 8 पदरी बायपास रस्ता उभारला जाणार आहे. या नव्या बायपास मार्गामुळे मुंबई-पुणे या दोन शहरांमधील अंतर 6 किमीने कमी होईल. तसेच या पट्ट्यात होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या मार्गावर दोन एलिव्हेटेड रोड आणि दोन बोगदे बांधण्यात येतील. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास पाऊण तासाने कमी होईल.
मागील काही वर्षांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघात आणि वाहतूककोंडीमुळे चर्चेत आहे. महामार्गावर वेगाची मर्यादा घालून दिली असतानाही वाहनचालक वेगाचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळेच या मार्गावर अपघाताचे मोठे प्रमाण वाढले आहे. शिवाय वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूककोंडीमुळे हा महामार्गही कमी पडू लागला होता. त्यामुळे एक्स्प्रेसचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसह एक्स्प्रेस वेची पाहणी केली.
पुढे आणखी वाचा, एक्स्प्रेस वेवर अपघातग्रस्तांसाठी चार ट्रॉमा सेंटर