आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Candidates Sunil Joshi Involve In Malegaon Blast

न्यायाधीश बॅनर्जी यांची हत्या करण्याचा सुनील जोशींनी रचला होता कट?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते सुनील जोशी यांनी गोध्रा हत्याकांड आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश यू.सी. बॅनर्जी यांचीही हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी जोशी यांनी न्या. बॅनर्जी यांच्या कोलकत्याच्या घराचीही रेकी केली होती, अशी माहिती 2006 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीने राष्ट्रीय अन्वेषण विभागाला (एनआयए) शनिवारी दिली.

राष्ट्रीय अन्वेषण विभागाच्या (एनआयए) चौकशीत आरोपीने सांगितले की, 15 ऑक्टोबर 2005 रोजी सुनिल जोशी कोलकत्याला गेले होते. या कोलकत्ता दौरा हा न्यायाधीश बॅनर्जी यांची हत्या करण्‍यासाठीच आखण्यात आला असल्याचे स्वतः जोशी यांनीच आरोपीला सांगितले होते. या दौर्‍यात या दोघांनी न्यायाधीश बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्याचेही त्याने सांगितले. परंतु जोशी यांचा हेतू लक्षात आल्यानंतर त्या आरोपीने जोशींची साथ सोडून दिली होती. आरोपीने दिलेल्या जबाबीची शहानिशा करणार असल्याचेही एनआयएच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी न्यायाधीश बॅनर्जी यांची निवड गोध्रा रेल्वे हत्याकांड आयोगाच्या अध्यक्षपदी केली होती. बॅनर्जी यांच्या अहवालात 2002 मध्ये झालेल्या साबरमती एक्सप्रेसमधील जळीत हत्याकांडात 58 लोक जिवंत जळाले होते. विशेष म्हणजे हा एक अपघात असल्याचेही नमूद करण्यात आले होते. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये जातीय दंगलीही उसळल्या होत्या.