आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीतील दलित मतांसाठी आरएसएसची धम्म रथयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षांत देशात दलितांविरुद्ध हिंसाचार वाढल्याने नरेंद्र मोदी सरकारवर दलित समाज नाराज असताना आणि याचा मोठा फटका उत्तर प्रदेश निवडणुकीत बसण्याची भीती वर्तवली जात असताना हे टाळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) धम्म रथयात्रा काढण्याचे ठरवले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. तीच तारीख धम्म रथयात्रेचा प्रारंभासाठी निवडली. दलित किंवा अनुसूचित जातीतील चर्मकार समाज नेहमीच हिंदुत्ववाद्यांसाठी सहज ताब्यात घेता येणारा वर्ग राहिला. महाराष्ट्रासह देशभर अनुसूचित जातींसाठी राखीव जागांवर चर्मकार समाजातील उमेदवारांना तिकीट देणे निवडून आणण्यासाठी िहंदुत्ववादी नेहमीच प्राधान्य देत आले. उत्तर प्रदेशात चर्मकार समाज बहुसंख्य असून अनेक मतदारसंघांत निर्णायक आहे. बसप नेत्या मायावती यांनी ऊनातील दलित अत्याचाराचा मुद्दा सर्वप्रथम संसदेत उपस्थित केल्यानंतर हा विषय देशभर गाजला आणि केंद्र गुजरातच्या भाजप सरकारची अडचण झाली होती. उत्तर प्रदेशातील दलितांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केले होते. या घटनेमुळे त्यांना परत बसपाकडे वळविण्यात मायावतींना मदत होऊ शकते. त्यामुळे दलितांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ द्यावी म्हणून धम्म रथयात्रा निघत आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशच्या दलितबहुल मतदारसंघातून जाईल.

संघ परिवारातील सदस्य संघटना भारतीय बौद्ध संघाद्वारे ही यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा १४ ऑक्टोबरला सुरू होईल आणि तिचा समारोप मोदी यांच्या शपथविधीला वर्षे पूर्ण होत असताना गुजरातमध्ये जुनागड येथे होत आहे. जुनागडची निवडही फार विचारपूर्वक करण्यात आली आहे. गुजरातमधील दलित चेतनेचे केंद्र म्हणून या शहराकडे पाहिले जाते. २०१३ मध्ये जयदेव बाप्पा यांच्या नेतृत्वात लाख लोकांनी येथे बौद्ध धम्माचा स्वीकारही केला होता.

ऊनातील दलितांनी नाकारले निमंत्रण
यायात्रेत ऊना येथील ज्या दलित तरुणांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली त्यांनाच सामील करून घेणार असल्याचे चित्र संघ परिवाराने निर्माण केले होते. हे चारही तरुण या यात्रेत सामील होणार असल्याचा दावा भंते राहुल यांनी केला. मात्र, या यात्रेत आपण सामील होणार नसल्याचे त्या तरुणांनी स्पष्ट केल्याने ही खेळी त्यांच्यावरच उलटली आहे. ‘आमच्यावर अत्याचार करणाऱ्या मनुवादी, जातीयवादी लोकांच्या कार्यक्रमाला आम्ही कसे जाणार? आम्हाला विचारताच संघ परिवाराने हा अपप्रचार केला,’ अशा शब्दांत ऊना दलित मारहाणीतील प्रमुख पीडित वसराम सरवय्या यांनी सांगितले.

चर्मकार समीकरण
संघपरिवारातील भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते संघप्रिय राहुल हे उत्तर प्रदेशातील पूर्वाश्रमीचे चर्मकार आहेत. या संघाचे उपाध्यक्ष नामदेव कदम हे महाराष्ट्रातील शिर्डी परिसरातील सक्रिय व्यक्ती आहेत. राष्ट्रीय मुस्लिम मंचासारखी संघ परिवाराशी संबंधित संघटना उभारण्याचा संघाचा मानस आहे. इंद्रेश कुमार यांच्या हस्ते या यात्रेला झेंडा दाखवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...