आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Former Speaker M.g. Vaidhya Reply To Raj Thackeray\'s Critics

राज ठाकरे, मी शंभरी साजरी करूनच जाईन- मा. गो. वैद्य यांचे प्रत्त्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य - Divya Marathi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य
नागपूर- स्वतंत्र राज्याच्या मुद्यांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केल्यानंतर त्यांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले आहे. सध्या मी 93 वर्षाचा आहे. तसेच आणखी 7 वर्ष मी जगणार आहे. शंभरी पूर्ण केल्यानंतरच मी जाईन. हां, तुमच्यासारख्यांनी गोळ्या वगैरे झाडून मारले तर भाग वेगळा असे सांगत राज यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून शिवाजी पार्कवर भव्य सभा घेतली. या सभेतील भाषणादरम्यान राज ठाकरेंनी भाजप व आरएसएसवर सडकून टीका केली होती. तसेच स्वतंत्र विदर्भ व मराठवाड्याच्या मुद्यांवरून राज यांनी श्रीहरी अणे आणि आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली.
महाराष्ट्राचे चार भागांत विभाजन झाले पाहिजे असे मत मा. गो. वैद्य यांनी मांडले होते. त्याचा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी वैद्य यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, मा. गो. वैद्य यांनी खूप केले. आता वय झाले. कशाला स्वतंत्र राज्याबाबत बोलतात. हा काय केक आहे काय तुमच्या वाढदिवसाचा. पाहिजे तसे तुकडे कर आणि वाटून खा. विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र करा म्हणता पण आता वय झाल्याने पृथ्वी सोडायची वेळ आली तरी यांना राज्याचे तुकडे कशाला हवेत अशा शब्दांत राज यांनी वैद्य यांच्यावर टीका केली होती.
राज यांच्या टीकेनंतर वैद्य यांनी लागलीच प्रत्त्युत्तर देत राज यांना सुनावले. मी आता 93 वर्षाचा आहे. मी आणखी 7 वर्षे जगणार आहे तसेच माझी शताब्दी साजरी करूनच मी येथून जाईन, अशा शब्दांत राज यांना फटकारले.
राज्य पुर्नरचना आयोग नेमा- वैद्य
भारतात अनेक मोठी राज्ये असून ती छोटी केली पाहिजेत. किमान 50 लाख ते कमाल 3 कोटी लोकसंख्या असलेली राज्ये बनविली पाहिजेत. महाराष्ट्राचे तुकडे केले तरी भाषा मराठीच राहणार आहे. विकासासाठी छोटी राज्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात राज्य पुर्नरचना आयोगाची स्थापना गरजेचे आहे असेही मा.गो. वैद्य यांनी पुर्नउच्चार करीत विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली.
पुढे वाचा, मा. गो. वैद्य यांच्या बाबतची रोचक माहिती..