आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RTO Fallow Rule In Nagpur, But Agents Give Life Threaten

आरटीओ: नागपुरात दादागिरी सुरूच; एजंटांकडून अधिका-याला जिवे मारण्याची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दलालबंदीच्या आदेशाला उपराजधानीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांत मात्र हरताळ फासण्यात आला. सोमवारीही हे कार्यालय दलालांनी गजबजलेले होते, प्रत्येक कर्मचा-यांच्या टेबलवरील बहुतांश कामेही त्यांच्यामार्फतच केली जात होती. इतकेच नव्हे तर परिवहन कार्यालयातील कर्मचा-यांना हे दलाल चक्क अधिका-यांसारखे आदेश बजावत होते.
कार्यालयातील गोपनीय दस्तावेजही ते बिनधास्तपणे हाताळत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत दिसून आले. माध्यमांचे प्रतिनिधी समोर असल्याचे लक्षात येताच कर्मचा-यांनी दलालांना काहीसे दूर करण्याचे नाटक केले, मात्र नंतर पुन्हा ‘पहिले पाढे’ सुरू झाल्याचे दिसून आले.

दलालबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे परिवहन निरीक्षक आनंद मोड यांना दलालांच्या टोळीने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याविरुद्ध मोड यांनी नागपुरातील सीताबर्डी आणि अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यासंदर्भात मोड म्हणाले की, दलालांचे काम करणारे काही जण झोपडपट्टीतील गुंड आहेत. त्यांनी काम हाती घेतलेल्या ७० टक्के लोकांना नापास केल्यामुळे त्यांचा धंदा बुडाला.

त्यामुळे जवळपास दहा जणांनी कार्यालयात येऊन शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांकडे मागितली सुरक्षा
परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु कार्यालयातील ६० जागा रिक्त आहेत. केवळ ४० टक्के कर्मचा-यांच्या जिवावर एवढे मोठे कार्यालय सांभाळणे अवघड आहे. दलालांना पूर्णपणे बंद करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम कर्मचारी, अधिकारी पुरेशा प्रमाणात हवेत. शासनाने खर्च करून यंत्रणा उभी केली तर दलालांला बंदी घालणे अवघड नाही. परिवहन निरीक्षक आनंद मोड यांनी दलालांचा दबाव झुगारून काम केले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली. त्यामुळे कर्मचारी, अधिका-यांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.
सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर