आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील रूची संघवीने फेसबुकला मिळवून दिला होता कोट्यवधींचा फायदा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निळ्या ड्रेसमधील रूची संघवी व अमेरिकेतील तिची एक सहकारी... - Divya Marathi
निळ्या ड्रेसमधील रूची संघवी व अमेरिकेतील तिची एक सहकारी...
पुणे/मुंबई- रुची संघवीचे वडील पुण्यात एक हेवी इंजीनियरिंग कंपनी चालवतात. तर तिचे आजोबा दादा स्टेनलेस स्टीलच्या उद्योगात होते. त्यामुळे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर रूची घरातील व्यवसायाच सांभाळेल असे ठरले होते. त्यावेळी तिचे वडील तिला म्हणत असत की, पुरुषांच्या वर्चस्ववादी जगात तू कशी निभावशील व वागशील? त्यावेळी ती वडीलांना विश्वासाने सांगायची, मी जे काही करेन त्यात नक्कीच यशस्वी होईन. 2005 मध्ये ती जेव्हा फेसबुकमध्ये ज्वाईन झाली तेव्हा सोशल मिडियात काम करणारी ती पहिला महिला इंजिनिअर ठरली होती. मात्र तेथेही रूचीने आपले वेगळे पण दाखवून दिले. रूचीच्या एका संकल्पनेमुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला.
पदवी घेतानाच रूचीला वॉल स्ट्रीटमध्ये एका बँकेत काम करण्यास संधी मिळाली होती. तेथील क्यूबिकल्स खूपच छोटे होते व तेथे तिला कम्फर्ट वाटत नसत. त्यावेळी तिने बँकेला सांगितले की, मला येलो फीवरचा त्रास आहे आणि ती काम करू शकत नाही. बॅंकेने तिला सोडण्याचा निर्णय घेतला व रूची ओरेकल कॉरपोरेशनमध्ये ज्वाईन झाली. त्यानंतर काही काळ तेथे काम केल्यानंतर रूचीने ओरेकल कंपनी सोडून फेसबुकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय चुकीचा असल्याचे घरच्यांचे म्हणणे होते. कारण फेसबुकमध्ये त्यावेळी केवळ 20 लोक होते.
फेसबुकमध्ये काम करताना रूचीला तिचा जुना वर्गमित्र आदित्य अग्रवाल भेटला. दोघांत पुन्हा मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रुचीने फेसबुकमधील न्यूजफीड फीचरचे पहिले व्हर्जन तयार केले होते. अर्थात याला प्रथम काहींनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले.
फेसबुकमध्ये काम करताना तिने कंपनीपासून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. मला आई-वडिलांना भेटायला जायचे असल्याचे कारण तिने कंपनीला दिले. त्यावेळी ती आदित्यसोबत डेटिंग करात होती. भारतात आल्यावर आदित्यसोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला. दोघांचे लग्न झाले. 2010 साली हे दोघेही फेसबुकमधून वेगळे झाले.
रूची व पती आदित्यने मिळून कोव नावाची कंपनीची सुरुवात केली. दोन वर्षातच ती 25 कोटी डॉलरला ड्रॉपबॉक्स कंपनीला विकली व दोघेही त्याच ंपनीत रूजू झाले. रुची ड्रॉपबॉक्समध्ये व्हाईस प्रेसीडेंट (ऑपरेशन्स) राहिली. वर्षभर तेथे राहिल्यानंतर तेथूनही ती बाहेर पडून सल्लागार म्हणून काम पाहू लागली.
प्रती ताशी 50 हजार यूजर्स फेसबुकशी जोडले-
फेसबुकमधील फीचर 'न्यूज फीड'ची आयडिया रुचीची होती. 2005 मध्ये रूचीने फेसबुक ज्वाईन केल्यानंतर संस्थापक जुकरबर्ग आणि त्याचे सहकारी साईटवर यूजर्सना जास्तीत जास्त वेळ यंगेज राहण्यासाठी काही तरी कल्पना शोधत होते. त्यावेळी रूचीने एक न्यूज पेपरसारखी आयडिया दिली. ज्यामुळे हार्डकोर वाचक तासनतास साईटवर राहू शकतील असे रूचीचे म्हणणे होते. ही आयडिया मार्कला पसंद आली. मग त्यानंतर तयार झाले फेसबुकचे फीचर 'न्यूज फीड'। केवळ या फीचरमुळे फेसबुकवर प्रती ताशी 50 हजार नवे यूजर्स राहू लागले. ज्यामुळे फेसबुकला कोट्यावधीचा फायदा मिळू लागला.
काही विशेष माहिती-
जन्म- 20 जानेवारी 1982
शिक्षण- कॉर्नेगी मेलन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये बॅचलर व मास्टर डिग्री

परिवार- पती आदित्य अग्रवाल
चर्चेत का- रूची नुकतीच पेटीएमशी जोडली गेली आहे.
पुढे पाहा रूची संघवीची निवडक छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...