आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rumors Of Cheap Home : Prakash Ambedkar Game Bring State Government In Trouble

अफवा स्वस्त घरांची: प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने राज्य सरकार अडचणीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अवघ्या 54 हजारांत घरे देण्याची अफवा पसरवून गेले दोन दिवस मंत्रालयात हजारोंच्या संख्येने लागलेल्या रांगा ही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने सुस्त राज्य सरकारची झोप उडवण्यासाठी रचलेली व्यूहरचना असल्याचे समोर येत आहे.सरकारने 18 वर्षांपूर्वी हिरानंदानींना पवई येथे केवळ 40 पैसे एकर या दराने अडीचशे एकरचा भूखंड दिला होता. त्यांना तेथे गरीबांसाठी 10 हजार घरे बांधण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र या नियमाला हरताळ फासत हिरानंदानीने स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. सरकारच्या मेहरबानीमुळे कवडीमोल दरात मिळालेल्या या भूखंडावर अलिशान घरे बांधत हिरानंदानी अब्जाधिश झाला. सरकारनेही याकडे दुर्लक्ष करत अप्रत्यक्षरित्या हिरानंदानीला मदतच केली होती. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोन वर्षांपूर्वी गरीबांसाठी 3 हजार घरे बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरही सरकारने दुर्लक्ष केल्याने अ‍ॅड. आंबेडकरांनी सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी हिरानंदानी संकुलावर मोर्चा काढून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 54 हजारांत घरे द्यावीत, अशी मागणी केली होती आणि तेथेच त्यांनी महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावे स्वस्त घरांचे फॉर्म वाटप केले. सोमवारी व मंगळवारी हे फॉर्म घेऊन हजारो लोक मंत्रालयात आल्याने गोंधळ उडाला.
हे घ्या पुरावे, आता तरी घरे द्या !
‘स्वस्त घरांसाठी अर्जच आले नाहीत, असा दावा सरकारने या प्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कोर्टात केला होता. हजारो लोकांनी भरलेले हे फॉर्म पुरावा म्हणून न्यायालयात दाखल करून आता तरी घरे द्या, अशी मागणी केली जाईल. बिल्डर्सचे उखळ पांढरे करण्याचा सरकारचा डाव त्यांच्यावर उलटणार आहे’, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.