आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात 90 टक्के शिक्षकांची दांडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या इयत्तेचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवले जातात तसेच या मुलांना शिकवायला शिक्षकही फिरकत नाहीत, असे धक्कादायक निरीक्षण शिक्षणावरील वार्षिक अहवालात नोंदवण्यात आले आहे. 2011 मध्ये विविध इयत्तेचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवण्याचे प्रमाण 36 टक्के असून शिक्षकांनी दांडी मारण्याचे प्रमाण 90 टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिक्षणाबाबत विविध राज्य सरकारांनी आपली गुणवत्ता नोंदवली नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरविले जात नाही. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग नाहीत. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांला अन्य वर्गात बसवले जाते. परिणामी त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. जवळपास 41.3 टक्के शाळांची अशी परिस्थिती असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.
यासंदर्भात मुंबई शिक्षक संघटनेचे नेते रमेश जोशी म्हणाले की, विविध इयत्तेच्या मुलांना एकाच वर्गात शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण मिळत नाही. शिक्षण पदविकेमध्ये याविषयी थोडीफार माहिती दिली जाते. मात्र, वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांना एकाच वर्गात बसून शिकवणे शिक्षकांसाठी कठीण जात असल्याचे जोशी म्हणाले.
प्रवेशाचे प्रमाण
6-14 वयोगट
68.2 % सरकारी
30.3 % खासगी
0.5 % अन्य
1.1 % शाळाबाह्य
एक दृष्टिक्षेप
पिण्याच्या पाण्याची सोय नाही
2010 18.7 %
2011 16.7 %
सुविधा आहे, पाणी नाही
2010 12.3 %
2011 10.2 %