आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेत आहे ही विदेशी महिला, कोणत्या कामासाठी भारतात चालवत आहे कॅम्पेन ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मूळची रशियन असलेली फोटोग्राफर व्हिक्टोरिया सध्या सोशल मीडियावर भारतीय महिलांसाठी एक कॅम्पेन चालवत असल्यामुळे खूप चर्चेत आहे. व्हिक्टोरियाने हिंदू देवींवर 'द लॉस्ट इंडियन गॉडेस' नावाचे फोटो सिरीज पब्लिश केली आहे. यामध्ये हिंदू देवींच्या माध्यमातून भारतीय महिलांची ताकद दाखवण्यात आली आहे. 28 वर्षीय व्हिक्टोरियाला महाभारताच्या माध्यमातून सर्वात पहिले हिंदू धर्माची माहिती मिळाली.

2012 मध्ये मुंबईत आली, सोशल मीडिया एक्स्पर्टसोबत केले लग्न
- व्हिक्टोरियाने divyamarahti.com ला दिलेल्या माहितीनुसार, ती 2012 मध्ये भारतात आली. त्यानंतर तिला येथे एका कंपनीत मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशिप मिळाली.
- व्हिक्टोरियाने सांगितले की, "ज्या दिवशी मी भारतात आले त्याच दिवशी मी देशाच्या प्रेमात पडले आणि मला हे स्वतःचे घर वाटू लागले."
- परंतु ज्याप्रमाणे प्रत्येक देशाच्या काही समस्या असतात ठीक त्याचप्रमाणे या देशाची एक समस्या आहे, परंतु मला नेहमी या देशात राहावे असे वाटते..
- व्हिक्टोरियाने मुंबईत सोशल मीडिया मार्केटिंग एक्स्पर्ट नितीन टोंसेसोबत लग्न केले असून हे दोघेही मुंबईत राहतात.

लहानपणी वाचले महाभारत, भारतात येऊन केला रिसर्च
- व्हिक्टोरिया सांगते की, तिने शाळेत असताना महाभारत वाचले होते. त्यामध्ये देवी-देवतांना ज्याप्रमाणे दाखवण्यात आले आहे, ते तिला खूप आवडले.
- परंतु काही काळाने ती सर्वकाही विसरून गेली होती. भारतात आल्यानंतर तिने येथील संस्कृतीचा खूप अभ्यास केला.
- या दरम्यान एका संस्थेशी संलग्न झाली. ही संस्था वेगवेगळ्या देशातील युथचे कल्चर आणि अनुभव एकाच प्लॅटफॉर्मवर मांडते.

फोटो सिरीजमध्ये 'पाच देवींची माहिती'
- व्हिक्टोरियानुसार, "मी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात बदल घडवू इच्छित आहे. परंतु याची सुरुवात मी स्वतःच्या घरातून म्हणॆ भारतातून करण्यास इच्छुक आहे."
- "माझे सर्व फोटोशूट महिलांच्या मुद्यावर नाहीत. परंतु ही काळाची गरज आहे."
- व्हिक्टोरियाच्या फोटो सिरीजचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये महिलांसाठी एक मॅसेज दडलेला आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, व्हिक्टोरिया आणि तिचे फोटोशूट का चर्चेमध्ये आहे...
बातम्या आणखी आहेत...