आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती तोडणाऱ्या खडसेंवर संतप्त शिवसेनेचा जळफळाट, सामनात खान्देशी भरतापेक्षाही झणझणीत बोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युती तुटली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याच सांगण्यावरुन युती तुटली होती, असा दावा तेव्हा केला होता. त्याच्या झळा मात्र आज खडसेंना सामनाच्या अग्रलेखात बसल्या आहेत. ‘युती तोडल्याचा आनंद खडसेंनी घेतला. मात्र, त्यांच्या आनंदावर इतक्या लवकर विरजण पडेल असं वाटलं नव्हतं’, अशा शेलक्या शब्दांत खडसेंचा पाणउतारा करण्यात आलाय.
वाचा सामनाचा अग्रलेख
कधी कधी राजकारणात जे पेरावे तेच उगवते याचा अनुभव घ्यावा लागतो. खडसे सध्या तो घेत आहेत. शिवसेनेबरोबरची युती तोडल्याचा आनंद त्यांनी घेतला. त्या आनंदावर इतक्या लवकर विरजण पडेल असे खडसे यांना वाटले नसेल. खडसे यांना हे सरकार आपले वाटत नाही. ‘तुमचे सरकार’ असे ते म्हणतात. तपस्येतून विरक्तीकडे…असा नवा मार्ग त्यांनी शोधला आहे काय?
खडसे, हे काय? तपस्येतून विरक्तीकडे…

- सध्याच्या राजकारणात ‘त्याग’ व ‘तपस्या’ हे शब्द मातीमोल ठरले आहेत, असे परखड मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. जमीन घोटाळा, दाऊद इब्राहिमशी संबंध व इतर बर्‍याच आरोपांवरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यामुळे फक्त चोवीस तासांत नाथाभाऊ होत्याचे नव्हते झाले. ज्या पक्षात चाळीस वर्षांत फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचण्याची वेळ आली, अशी अवस्था नाथाभाऊंची झाली आहे. ‘मीडियाची ब्रेकिंग न्यूज पूर्णपणे खरी नसते हे माहीत असतानादेखील पक्षाने मीडियावरच विश्‍वास ठेवला. त्यामुळे माझी ४० वर्षांची मेहनत आणि तपस्या वाया गेली…’ असा आतला ‘आवाज’ खडसे यांनी विनोद तावडे यांच्या साक्षीने काढला.
- अर्थात, स्वत: तावडेदेखील ‘डिग्री’ प्रकरणात सुपातून जात्यात भरडले जाता जाता बचावले आहेत. त्यामुळे नाथाभाऊंच्या आतल्या आवाजाने तावडे यांचे कान उगाच बधिर झाले असतील. ‘त्याग’ व ‘तपस्या’ या शब्दांची जागा निदान राजकारणात तरी ‘कपट’, ‘कारस्थान’ या शब्दांनी घेतली आहे. खडसे यांना असे वाटते की, त्यांच्या बाबतीत दगाबाजी झाली आहे. ‘योग्य वेळी तोंड उघडून देशात भूकंप घडवू,’ अशी धमकी त्यांनी मधल्या काळात दिली होती, पण इटलीत व युरोपातील काही राज्यांत भूकंप झाला, देशात महापूर आले. मात्र खडसे यांचा बॉम्बगोळा फुटून भूकंप काही होत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा....‘माझीच दृष्ट लागे माझ्याच संसाराला’.... खडसे यांचे जळगावातील राजकीय हाडवैरी चार-साडेचार वर्षे तुरुंगात का सडवले गेले....
सौजन्य-सामना
बातम्या आणखी आहेत...