आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता- संजय राऊत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्‍या दैनिक सामनामधील कार्टूनमुळे सध्‍या चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. या वादावर अखेर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मत मांडले. एका वृत्‍तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, ''मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी माफीही मागितली आहे. वर्तमानपत्रातील सर्वच बातम्‍या संपादक पाहतातच असे नाही.'' असे स्‍पष्‍टीकरण राऊत यांनी दिले आहे.
काय म्‍हणाले संजय राऊत..
मराठा आरक्षणाबाबत ‘सामना’मधून गेल्या काही महिन्यांपासून भूमिका मांडली जात आहे. गरीब मराठा समाजाबाबत सहानुभूती बाळगा, असेे मत सामनातून व्यक्त केले जात होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालेेच पाहिजे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आरक्षण मिळावेे.
प्रभूदेसाईंनी माफी मागितली..
‘सामना’तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे ते म्‍हणाले. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र ती ताणायची हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे.
माथी भडकावण्‍याचे काम..
सध्‍या लोकांची माथी भडकाऊन राज्‍यात अस्थैर्य निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. आघाडीच्या काळात अॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना घडल्‍या, तेव्हा तुम्ही शांत का होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
तो हल्ला नाही
सामनाच्या कार्यालयावर झालेल्‍या दगडफेकीला आम्‍ही हल्‍ला मानत नाही. हल्‍ला कसा असतो हे आमच्‍याकडून शिकायला हवे, असेही संजय राऊत यावेळी म्‍हणाले. आमच्‍या कार्यालयावर हल्ला झाला असता, तर हल्लेखोर दिसलेही नसते, लांबून दोन दगड मारणाऱ्याला हल्ला म्हणत नाहीत, असेही ते म्‍हणाले.
बातम्या आणखी आहेत...