आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगचित्र वाद : ‘सामना’वर हल्ला; उद्धव ठाकरेंनी माफी मागावी : विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मूकमोर्चावर व्यंग करणारे व्यंगचित्र प्रकाशित केल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या नवी मुंबईतील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मंगळवारी दुपारी १.४५ वाजता तीन युवक वाहनातून नवी मुंबईच्या सानपाडा भागातील सामनाच्या प्रिंटिंग प्रेस इमारतीत पोहोचले. सुरक्षा रक्षकाने त्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्यावर हे तीन युवक वाहनातून खाली उतरले आणि प्रिंटिंग प्रेसवरदगडफेक करून पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात इमारतीच्या बाह्य भागाच्या दोन ते तीन काचांचे नुकसान झाले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडने ‘सामना’मध्ये छापलेल्या व्यंगचित्राचा निषेध करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्ही या व्यंगचित्राचा निषेध करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले. हा हल्ला उत्स्फूर्त असून मराठा समाजाच्या भावनांची अभिव्यक्ती आहे, असेही ते म्हणाले. सामनामध्ये रविवारी मूकमोर्चावर व्यंग करणारे व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. त्यावर विविध राजकीय पक्षांनी टिकेची झोड उठवली होती.

शिवसेनेने माफी मागावी : चव्हाण
मराठाआरक्षणासारख्या गंभीर विषयाची टिंगलटवाळी करून या मोर्चात सहभागी लाखो माता भगिनींचा व्यंगचित्र काढून अवमान करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करत शिवसेनेने जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कार्यकारी संपादकच ‘कार्टून’: शेलार
सामनाच्याकार्यकारी संपादकाचे अाजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच कार्टून म्हणावे लागेल. याप्रश्नी कार्यकारी संपादकांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अाशिष शेलार यांनी केली.

जवान महिलांचा अवमान : मुंडे
या व्यंगचित्रातून शहीद जवानांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा, पाेलिसांचा महिलांचा अवमान झाला अाहे. त्याबद्दल ‘सामना’वर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी माफी मागावी : विखे
व्यंगचित्रसंतप्त करणारे अाहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी. सरकारने सामनावर फाैजदारी खटला भरून संपादकांना अटक करावी. या वृत्तपत्राच्या शासकीय जाहिराती बंद कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...