आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ, सचिन, लतादीदींनी ट्विटरवर केली एकमेकांची स्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभने अहमदाबादचे हे छायाचित्र ट्विट करून सचिन व लताची स्तुती केली.
मुंबई - लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर हे त्यांच्या क्षेत्रात महान आहेत. पण सर्वात महान कोण? या मुद्द्यावर तिघांत चर्चा सुरू झाली. पण ती एखादे व्यासपीठ अथवा कार्यक्रमात नव्हे, तर ट्विटरवर.
अमिताभ काही दिवसांपूर्वी अहमदाबादेत होते. तेथे त्यांना रस्त्याच्या बाजूला भिंतीवर एक पोस्टर दिसले. त्यात आधी लता, नंतर अमिताभ आणि त्यानंतर सचिनचे चित्र होते. अमिताभने हा फोटो ट्विट केला. सोबत लिहिले-‘अहमदाबादच्या रस्त्यावरील एक भिंत... जी व्यक्ती मध्ये आहे ती इतर दोन महान व्यक्तींमध्ये तेथे नसावी.’ त्यानंतर अमिताभ यांच्या प्रशंसकांनी अनेक ट्विट केले. बहुतेकांनी लिहिले-‘अमिताभ, तुम्हीही महान आहात. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो.’ अमिताभच्या ट्विटवर हजार लोकांनी रिट्विट केले आणि अडीच हजारांनी लाइक केले. नंतर सचिनने रिट्विट करताना लिहिले-‘या फोटोत फक्त एकच व्यक्ती अशी आहे की तिला माजी संबोधले जाते. अमिताभ व लता मंगेशकर माझे प्रेरणास्रोत आहेत. ते कालातीत आहेत.’ दीड हजार लोकांनी हा मेसेज रिट्विट केला, त्याला अडीच हजार लाइक्स मिळाल्या. मग लतादीदीही मागे कशा राहतील? त्यांनीही सचिनच्या ट्विटवर लिहिले-‘नमस्कार,अमितजी व सचिन. असे म्हणणे ही आपली विनम्रता आहे. पण खरे तर आपण दोघेही जागतिक रत्न आहात.’