आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-खडसे यांची सेटलमेंट; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर केलेला ‘सेटलमेंट’चा गंभीर आरोप तर खडसे यांनी राज ठाकरे यांचे बिल्डरांशी संबंध असल्याचा केलेला प्रतिआरोपाचा खटला राज्यातील जनतेच्या न्यायालयासमोर सध्या सुरू असून या खटल्याचा निकाल अद्याप बाकी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.ठाकरे यांच्यावर यापूर्वीही ‘मांडवली’चे आरोप झाले आहेत. मनसे अध्यक्षांनी खडसे यांच्यावरील आरोपांची ब्ल्यू प्रिंट देण्याअगोदरच खडसे आणि राज यांनी ‘सेटलमेंट’ केली असावी, अशी शक्यता सावंत यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेत्याच्या प्रतिमेवरील डाग धुण्यापेक्षा या प्रकरणावर पडदा टाकणे हे भाजपला महत्त्वाचे का वाटले, असा सवालही सावंत यांनी या वेळी उपस्थित केला.