आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाईकवरून चालले होते कपल, सचिनने कार थांबवून लक्षात आणून दिली ही महत्त्वाची बाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोड सेफ्टीचा संदेश देताना सचिन.... - Divya Marathi
रोड सेफ्टीचा संदेश देताना सचिन....
मुंबई- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात ते रस्त्यावरून चाललेल्या लोकांना हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकीवरून प्रवास करू नका सल्ला असा देताना दिसत आहे. एक दुचाकीस्वाराने स्वत:तर हेल्मेट घातले आहे पण मागे बसलेल्या पत्नीने हेल्मेट घातलेले नव्हते. त्याचवेळी सचिन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. सचिनची कार पुढे जाऊन थांबते व हे जोडपे पुढे येईपर्यंत थांबते. ते जोडपे जवळ येताच सचिन संबंधित दुचाकीस्वाराला म्हणतो, तू हेल्मेट घातले ते योग्यच पण मागे बसलेल्याही सर्व व्यक्तीने हेल्मेट घालणे गरजेचे आहे. 
 
- 54 सेकंदाचा हा व्हिडिओ मुंबई परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. यात सचिन नागरिकांना ट्रॅफिक नियम सांगताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ सचिनने कधी शूट केला हे समजले नाही.
- व्हिडियो ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताना सचिन लिहतो की, "‪Rider or pillion, both lives matter equally. Please, please make wearing helmets a habit. Just my opillion 😊 #HelmetDaalo2.0 #RoadSafety"
- याद्वारे सचिन संदेश देतो, रस्त्यावरून बाईकवरून जाताना हेल्मेट केवळ पुढे बसणा-यानेच नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घातले पाहिजे.
- सचिन एका कपलला थांबवून प्रेमाने म्हणतो, "Wear helmat at the back Also, Why Should Rider only wear helmet." याद्वारे दुचाकीस्वार मान हालवून सचिनला प्रतिसाद देतात व हेल्मेट घालू असे आश्वासन देतात. 
- एक युवक सचिनला पाहून उत्साहित होतो. त्याला त्याच्यासोबत बोलायचे असते पण सचिन म्हणतो रस्त्यावर थांबू नको. पुढे जा...
 
व्हायरल झाला सचिनचा व्हिडिओ- 
 
- सचिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे. सचिनने यापूर्वीही महत्त्वाच्या सामाजिक विषयावरील अनेक व्हिडिओ शेयर केले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लोकांना रस्त्यात हेल्मेटचे महत्त्व सांगतानाचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...