आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने बारामतीत लुटला दिवसभर आनंद, कसा ते पाहा मोजक्या फोटोतून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर पवारांच्या विद्या प्रतिष्ठानमधील संग्राहलायाला भेट दिली. - Divya Marathi
सचिनने स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर पवारांच्या विद्या प्रतिष्ठानमधील संग्राहलायाला भेट दिली.
बारामती- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुधवारी दिवसभर बारामतीत होता. सकाळी 11 च्या सुमारास बारामतीत विशेष हेलिकॉप्टरने पोहचलेला रात्री उशिरा मुंबईत पोहचला. सचिनने बुधवारी दिवसभर बारामतीत आनंद लुटला. तसेच त्याला पाहण्यासाठी आलेल्या हजारो चाहत्यांनाही त्याने मनसोक्त आनंद दिला.
सचिनने शरद पवारांसोबत मुंबई विरूद्ध महाराष्ट्र या टी-20 लढतीचा आनंद घेतला. अर्थातच त्याचा पाठिंबा असलेल्या मुंबईने अटीतटीचा हा सामना जिंकला. त्याआधी सचिनने दुपारी भोजनावर ताव मारला. सचिनला झणझणीत गावरान मटण खूप आवडले. या भोजनाची व्यवस्था दिलीप पडळकर यांनी केली होती. मटणाची चव आवडल्याने सचिनने दिलीप पडळकर यांच्यासमवेत एक सेल्फी घेतला.
यानंतर तोस स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी हजर झाला. सायंकाळी सामना होईपर्यंत तो बारामतीतील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. सुप्रिया सुळेंनी ही सैर घडवून आणली. सचिनसोबत अजिंक्य रहाणे दिवसभर होता. अजिंक्यनेही बारामतीत येऊन दिवसभर आनंद व मनसोक्त पाहुणचार घेतला.
पुढे निवडक छायाचित्रातून पाहा, सचिनचा बारामतीतील दिवसभराचा दौरा...
(फोटो सौजन्य- स्वप्निल शिंदे)