आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar & PepsiCo Putting Together A Plan For Drought Relief In Marathwada Fadnavis

सचिन तेंडुलकर मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपणा सर्वांनाच माहित आहे. आता मराठवाड्यातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मदतीला धावणार आहे. सचिन जागतिक बडी कंपनी पेप्सिकोच्या मदतीने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करणार आहे. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सचिन तेंडुलकरने आज मुंबईत दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्याने दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही काही करू इच्छितो असे सांगितले. तसेच पेप्सिको कंपनीही मदतीला तयार असल्याचे सांगितले.