आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सचिनचा \'धडा\' शालेय अभ्यासक्रमात घ्या\', मास्टर ब्लास्टर आत्मचरित्र लिहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 वर्षांची लांबलचक कारकिर्द संपवून नुकताच निवृत्त झाला आहे. त्याची कारकिर्द, त्याचा खेळ, देशाबाबत असलेली निष्ठा, कठोर मेहनत, संयम, टीकाकार व त्यांच्या टिप्पणीकडे दुर्लक्ष करणे या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेला सचिन तेंडूलकर एक आदर्श भारतीय आहे. त्यामुळे सचिनच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणा-या धड्याचा (पाठ) शालेय पाठपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठोपाठ राज्य शिक्षण परिषदेने केली आहे.
मनविसेने याबाबत मागील महिन्यात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे एक मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर आता मनविसेची मागणी राज्याच्या शिक्षण परिषदेने उचलून धरली असून, त्याबाबतचे पत्र परिषदेने राज्य सरकारकडे पाठविले आहे. तसेच त्याच्या धड्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावी अशी मागणी केली आहे. सचिन हा युवकांचा प्रेरणास्त्रोत असून, त्याच्या कर्तृत्त्वामुळे शालेय स्तरावर क्रीडा क्षेत्राची मुलांत आवड निर्माण होईल व आरोग्यसंपन्न युवक बनण्यास मदत होईल, असे त्यात म्हटले आहे
पुढे वाचा, मास्टर ब्लास्टर आत्मचरित्र लिहणार