आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar\'s Historic 200\'s Test At Wankhede Stadium

LIVE PHOTO: सचिनला शेवटचे खेळताना पाहण्यासाठी सेलिब्रेटींची वानखेडेवर धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महान फलंदाज सचिन तेंडूलकरची ऐतिहासिक अशी 200 वी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु झाली आहे. सचिनला शेवटचे खेळताना पाहण्यासाठी देशभरातील सचिनचे काही फॅन्स मुंबईत दाखल झाले आहेत. तर, लाखो लोक टीव्हीसमोर ठाण मांडून बसले आहेत.
सचिनची खेळ पाहण्यासाठी सचिनची आई रजनी तेंडूलकर आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटचे त्याचा खेळ पाहण्यासाठी वानखेडेवर पोहचल्या आहेत. याचबरोबर सचिनचे संपूर्ण कुटुंब दाखल झाले आहे. यात सचिनची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा, भाऊ अजित पोहचले आहेत. याचबरोबर सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर एका विशेष कारने स्टेडियमवर पोहचले. प्रकृती अवस्थेमुळे आचरकेर सरांसाठी एमसीएने खास खुर्ची बनविली व त्यासाठी वेगळी जागाही केली आहे. याचबरोबर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंही सचिनचा सामना पाहण्यासाठी आले आहेत. यात वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड यांचा समावेश आहे.
याचबरोबर बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान, राज ठाकरे, एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे सुद्धा वानखेडेवर दाखल झाले आहेत.
छायाचित्र- सचिन 200 वी कसोटी खेळण्यासाठी मैदानात जात असतानाचा क्षण. उजवीकडे कर्णधार धोनी दिसत आहे.