आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊंच्‍या मध्‍यस्‍थीला शेतकऱ्यांचा सकारात्‍मक प्रतिसाद, सरकारचे एका दगडात दोन पक्षी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करा,शेतमालाला हमीभाव द्यावा यासह इतर अनेक मागण्यांसाठी राज्‍यातील शेतकरी 1 जुनपासून संपावर जात आहेत. दोन महिन्‍यांपूर्वीच त्‍यांनी याबद्दल सरकारला इशारा दिला होता. या पार्श्‍वभू‍मीवर अहमदनगरमधील पुणतांबा येथे 6 दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलन करत आहे.
 
त्‍यांची मनधरणी करण्‍यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास सरकारचे प्रतिनिधी म्हणून कृषिराज्‍यमंत्री सदाभाऊ खोत पुणतांबे गावात दाखल झाले होते. यावेळी त्‍यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनावर तोडगा काढण्‍यासाठी मध्यस्‍थी केली तसेच शेतकऱ्यांना मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करण्‍यासाठी आमंत्रित केले. याला शेतकऱ्यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र राज्य किसान क्रांती संघटनेच्या कोअर कमिटीने मुख्‍यमंत्र्यांसोबत चर्चा करण्‍याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी संध्‍याकाळी मुंबई येथे वर्षा बंगल्‍यावर शेतकरी आणि मुख्‍यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

मुख्‍यमंत्र्यांची खेळी? राजू शेट्टींचा आत्‍मक्‍लेश
आज मुंबई येथे राजभवनावर राजू शेट्टींची आत्‍मक्‍लेश यात्रा धडकणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टींनी ही यात्रा सूरू केली आहे. नेमके याच दिवशी सदाभाऊंना मध्‍यस्‍थीला पाठवून सरकारने स्‍वाभिमानमध्‍ये उभी फुट पाडत मोठी खेळी खेळल्‍याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसेच आत्‍मक्‍लेश यात्रेच्‍या दरम्‍यानच काही शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित करुन मुख्‍यमंत्र्यांनी अचूक टायमिंग साधल्‍याचे बोलले जात आहे.
 
राज्‍यातील सर्व शहरात दुध, भाजीपाला नेणारी वाहने अडवणार
नगर येथील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांनी बैठक घेतली. मुंबई, पुणेसह राज्यातील सर्व शहरात दुध, भाजीपाला नेणारी वाहने १ जुनपासुन अडवण्‍याचा निर्णय या बैठकीत घेण्‍यात आला. यावेळी इतर बाजार समित्‍यांनीही या आंदोलनात सहभागी होण्‍याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले. शेतकऱ्यांच्‍या आंदोलनाला हमाल संघटनांनीही पाठींबा दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...