आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadbhavana Divas Celebrate In Mantralaya At Mumbai

PHOTOS: सद्‌भावना दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्‌भावना दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त चव्हाण यांनी यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
या प्रसंगी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे आदी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प वाहून अभिवादन केले.
पुढे आणखी पाहा, सदभावना दिन समारंभाची छायाचित्रे...