आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथ इंडियन फिल्म पाहून बनला IPS, 'मुन्नाभाई' स्टाईलमुळे असा फसला हा यंग ऑफिसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी जोइसी एन जियासमवेत आयपीएस सफीर करीम..... - Divya Marathi
पत्नी जोइसी एन जियासमवेत आयपीएस सफीर करीम.....
चेन्नई/मुंबई- यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत कॉपी करताना पकडला गेलेला आयपीएस अधिकारी सफीर करीमला बरखास्त केले जाऊ शकते. गृह मंत्रालयाने या प्रकरणी तमिळनाडू सरकारकडून रिपोर्ट मागवला आहे. सफीर करीम हायटेक पद्धतीने कॉपी करताना पकडला गेला आहे. तो ब्लूटूथद्वारे आपल्या पत्नीला प्रश्नांचे उत्तरे विचारत होता. कॉपी करताना पकडलेला आरोपी आयपीएस अधिकारी IAS किंवा IFS बनण्यासाठी यूपीएससी परीक्षा देत होता. शफीर याच्याबाबत सांगितले जाते की, तो 2005 मध्ये आलेल्या मल्याळम फिल्म 'भरतचंद्रन IPS' पासून प्रभावित होऊन सिविल सर्व्हंट बनला.
 
- खरं तर या फिल्ममध्ये अॅक्टर सुरेश गोपीने पोलिस कमिश्नर भारत चंद्रनचा रोल प्ले केसा होता.
- आयपीएस बनल्यानंतर सफीर करीम बॉलिवूड फिल्म 'मुन्नाभाई एमबीबीएस' च्या धर्तीवर कॉपी करताना पकडला गेला.
- पत्नी जोइसी एन जिया हैदराबादमधून ब्लूटूथद्वारे आयपीएस पतीला कॉपी करताना मदत करत होती.
- आरोपीची पत्नी जोइसी सुद्धा यूपीएससी परीक्षाचे तयारी करत आहे. करीमने तिला यासाठी प्रवृत्त केले.
- जोइसीने केरळमधील लॉ एक्सलन्स आयएएस अॅकेडमीत शिक्षण घेतले होते. तेथेच काही काळ सफीर करीम शिकवायला जात होता.
- 2014 मध्ये सिविल सेवा परीक्षा पास केल्यानंतर करीमने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, ''आयपीएस परीक्षा पास करणे एका व्हिडिओ गेमसारखे आहे. जर तुम्हाला त्याचे तंत्र आणि मंत्र माहित असेल तर सिविल सेवा परीक्षा पास होणे खूप सोपे आहे.''
 
ऑल इंडिया 112 वी रॅंक मिळवली-
 
- एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, यूपीएससी परीक्षेत सफीर करीमने 112 वी रॅंक मिळवली होती.
- करीमने सिविल सर्विस 2014 परीक्षेत एथिक्सच्या पेपरमध्ये खूपच चांगले मार्क मिळवले होते.
- हा पेपर एखाद्या उमेदवाराची प्रामाणिकता तपासण्यासाठी घेतला जातो.
 
420 नुसार होऊ शकते कारवाई-
 
- देशभरातील 24 सेंटर्सवर 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात सिविल सर्विसेस 2017 की मुख्य परीक्षा झाली.
- चेन्नईत एग्मोर गवर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर तामिळनाडूतील तिरुनेवेली जिल्ह्यातील IPS अधिकारी सफीर करीम परीक्षा द्यायला पोहचला. तेथे परीक्षकाने सफीरला ब्लूटूथद्वारे बातचीत करताना पकडले होते.
 
केरळचा रहिवासी आहे सफीर करीम-
 
- 2014 बॅचचा आयपीएस असलेला सफीर करीम केरळमधील कोच्चीचा रहिवासी आहे. तो सध्या तामिळनाडू केडरच्या पोलिस विभागात आपली सेवा देत आहे.
- आयपीएस बनण्याआधी सफीर करीमने इंजिनियरिंग डिग्री घेतली आहे. तो तिस-या अटेम्प्टमध्ये आयपीएस बनला होता.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सफीर करीमचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...