आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅम्बी व्हॅली’ची लिलाव प्रक्रिया सुरू, लोणावळ्याजवळ 6,761.64 एकरवरील वैभवावर टाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. पण त्यांचे हे अपिल फेटाळण्यात आले. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी अॅम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. पण त्यांचे हे अपिल फेटाळण्यात आले. (संग्रहित फोटो)
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सहारा समूहाच्या पंचतारांकित ‘अॅम्बी व्हॅली’ या वसाहतीच्या लिलावाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. यासाठी ३७,३९२ कोटी रुपये किमान मूल्य (रिझर्व्ह प्राइस) निश्चित करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत अवसायक विनोद शर्मा यांनी या लिलावाची सूचना जारी केली.
 
मुंबई-पुणे महामार्गावरील लोणावळ्याजवळ ६,७६१.६४ एकर जमिनीवर उभारलेल्या या इंटिग्रेटेड हिल सिटी टाऊनशिपसाठी संभाव्य निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. टिम्बरचे बंगले, मॉडर्न व्हिला, गोल्फ कोर्स, रुग्णालय, शाळा, विमानतळ आणि अन्य सुविधांचा आदेशानुसार लिलाव केला जाईल.  

दोन टप्प्यांत चालणार बोली प्रक्रिया : शर्मा म्हणाले, अॅम्बी व्हॅली सह्याद्री पवर्तरांगेच्या कुशीत वसली आहे. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना किमान मूल्याची १५ टक्के रक्कम अनामत राशीच्या रूपात जमा करावी लागेल. ही लिलाव प्रक्रिया दोन दिवस दोन टप्प्यांत पार पडेल. लिलाव प्रक्रिया १६ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याची विनंती गुरुवारी सहारा समूहाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.
 
दरम्यान, सहाराने सेबीची उर्वरित रक्कम देण्यासाठी १८ महिन्यांची अतिरिक्त मुदत मागितली होती. त्यावर न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत सेबीच्या खात्यात १५०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार सहाराने उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने दिलेल्या मुदतीत सेबीच्या खात्यात जमा केल्यास याप्रकरणी विचार होऊ शकतो. दरम्यान, अॅम्बी व्हॅलीची एकूण बाजारभूत किंमत सुमारे एक लाख कोटी रुपये असल्याचा दावा सहाराने केला आहे.  

७ सप्टेंबरपर्यंत १५०० कोटी जमा केल्यास लिलावास स्थगिती: अवस्थी यांच्या मते,  ७ सप्टेंबरपर्यंत सहारा समूहाने १५०० कोटी रुपये सेबीच्या खात्यात जमा केल्यास अॅम्बी व्हॅलीच्या लिलावास स्थगिती दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. सेबीच्या दाव्यानुसार, सहारा समूहाकडून मुद्दल आणि व्याजाच्या रूपात एकूण ३७ हजार कोटी रुपये वसूल करायचे आहेत. सहाराकडून सध्या मुद्दलातीलच ९ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत.
 
आरपीआयएफएल कंपनीचा अॅम्बी व्हॅलीत १०,७०० कोटी गुंतवणुकीचा प्रस्ताव  
मॉरिशसच्या रॉयल पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट फंड लिमिटेड (आरपीआयएफएल) या गुंतवणूकदार कंपनीने अॅम्बी व्हॅलीत १०,७०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सहारा समूहास दिला होता. सहारा समूहाचे वकील गौतम अवस्थी म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिला असून यात आरपीआयएफएलद्वारा नामनिर्देशित व्हिक्टर कोनिग यूके लिमिटेडशी करार करण्यास मंजुरी देण्याची विनंती केली आहे. अॅम्बी व्हॅलीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय असून लिलाव प्रक्रिया थांबवण्याचाही त्यामागे हेतू आहे.  
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...