आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराच्या फाइल्ससाठी सेबीकडून रोबोटिक यंत्रणेचा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सहारा ग्रुपकडून गुंतवणूकदारांची शेकडो कागदपत्रे प्राप्त झाल्याने बाजार नियामक सेबीने ती वेअर हाऊसमध्ये ठेवली आहेत. ही कागदपत्रे हाताळण्यासाठी सेबीने स्वयंचलित रोबोटिक प्रणालीचा वापर केला आहे.
सेबी-सहारा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सहाराच्या दोन ग्रुपमधील गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची शहानिशा करून त्यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा ग्रुपचे साधारण तीन कोटी गुंतवणूकदार आहेत. सहारा ग्रुपला कागदपत्रे सोपवण्याचे आदेश बजावल्यानंतर कंपनीने 128 ट्रकमधून सेबीच्या मुख्यालयात कागदपत्रे जमा केली. कार्यालयातील अपुर्‍या जागेमुळे सेबीने ही कागदपत्रे एसएचसीआयएल प्रोजेक्ट लि.च्या वेअर हाऊसमध्ये ठेवली. वेअर हाऊसमध्ये कागदपत्रे हाताळण्यासाठी रोबोटिक प्रणाली कार्यरत आहे. नवी मुंबईतील या वेअर हाऊसची साठवणूक क्षमता 32 लाख घनफूट आहे. डीमॅट अकाउंट अस्तित्वात येण्यापूर्वी शेअर सर्टिफिकेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी वेअर हाऊस बांधले होते.