आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड बझ: \"बाहुबली\'ची निर्मिती सर्वांसाठीच प्रेरणादायक \" शाहरुख खानकडून कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- "बाहुबली'हा प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचे प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद. "तुमच्यात झेप घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आकाशापर्यंत पोहोचू शकता,' अशा शब्दांत बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने "बाहुबली' या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली, अभिनेता प्रभास, राणा दुग्गुपती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना यांचे मनापासून कौतुक केले आहे.

शाहरुख म्हणाला, सध्या आपण "दिलवाले' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बल्गेरिया येथे आहोत. चित्रीकरण संपल्यानंतर हा चित्रपट पाहिला. चित्रपटासाठी राजमौली त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच प्रभास आणि इतर कलाकारांनी दर्जेदार काम केले. हा चित्रपट सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. या चित्रपटामुळे अनेकांचे मनोबल उंचावेल.

"बाहुबली' या चित्रपटासमोर सलमानचा "बजरंगी भाईजान' हा चित्रपट होता, तरीदेखील बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. दोन भावांची राजा बनण्याची रंजक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशात अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. विशेष करून अाबालवृद्धांना हा चित्रपट भुरळ घालत आहे.

प्रभासचा दर्जेदार अभिनय
"बाहुबली'चित्रपटात अभिनेता प्रभासने प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच चित्रपटात त्याने दर्जेदार अभिनय केला आहे. या चित्रपटासाठी त्याने शरीरयष्टी तयार करण्यासाठी खास सराव केला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"बजरंगी' २८३ कोटी, "दृश्यम' १७ कोटी
ईदच्यामुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या "बजरंगी भाईजान' या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २८३ कोटींची कमाई केली असून हा आकडा ३०० कोटींच्या घरात लवकरच जाईल, असे समीक्षक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. दुसरीकडे या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या "दृश्यम'ने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १७ कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला देशभरातून प्रेक्षकांची माेठी पसंती िमळत आहे.
बातम्या आणखी आहेत...