आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ अली खानचे राडा मिटवण्याचे प्रयत्न

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण आफ्रिकास्थित उद्योजक इक्बाल शर्मा आणि त्यांचे सासरे रमण पटेल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अभिनेता सैफ अली खानभोवती उठलेला वादाचा धुरळा खाली बसल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेऊ नये, यासाठी त्याने मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सैफला या संदर्भात विचारणा केली असता त्याने आपण शर्मा यांच्याशी बोलून पडदा टाकण्याचे प्रयत्न करत असल्याची कबुली दिली. तो म्हणाला, त्या रात्री जे काही घडले, त्यानंतर मला अडकवल्याचे अजिबात सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नाही. परंतु हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळता आले असते, असे मला वाटते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला मारण्याची कल्पना हजार वर्षांत माझ्या मनातही येणार नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते.