आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saif Ali Khan News In Marathi, Hearing, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफची एनआरआयला मारहाण; खटल्याची सुनावणी नोव्हेंबरमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सैफ अली खान याने २०१२ मध्ये एका हॉटेलमध्ये अनिवासी भारतीयाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या सुनावणीला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. स्थानिक न्यायालयाने या प्रकरणातील सर्व जबाब नोंदवून घेतले आहेत. सरकारी वकील वाजिद शेख यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी झालेल्या प्रसंगाचे सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.
फेब्रुवारी २०१२ मध्ये सैफ पत्नी करिना कपूर, करिश्मा कपूर आणि इतर मित्रांसह एका हॉटेलमध्ये गेला होता. या वेळी अनिवासी भारतीय इक्बाल मीर शर्मा व त्यांच्या सास-यांना सैफ व त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण केली होती.गोंधळ करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे संतापलेल्या सैफ आणि त्याच्या मित्रांनी शर्मा व त्यांच्या सास-यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर शर्मा यांनी सैफविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.