आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर मुर्ख बनवत आहे, 500 किलो वजन कमी करणाऱ्या इमानच्या बहिणीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमानच्या बहिणीने डॉक्टर मूर्ख बनवत असल्याचा आरोप केला. - Divya Marathi
इमानच्या बहिणीने डॉक्टर मूर्ख बनवत असल्याचा आरोप केला.
मुंबई - जगातील सर्वात वजनदार महिला इमान अहमद अब्दुलातीच्या बहिणीने डॉक्टर धोका देत असल्याचा आरोप केला आहे. 500 किलो वजन असलेल्या इमानवर मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तिच्या बहिणीचे - सायमा सेलिमचे म्हणणे आहे, की डॉ. मुफज्जल लकडावाला खोटे बोलत असून बहिणीबद्दल खरी माहिती सांगत नाही. इमानच्या स्थितीत काहीही फरक पडला नसल्याचे सायमाचे म्हणणे आहे. दुसरीकडे डॉ. लकडावालांनी आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 
 
बहिणीला घरी घेऊन जाण्याची नाही सायमाची इच्छा 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. लकडावाल यांनी सायमाचे आरोप फेटाळले आहेत. डॉ. लकडावाला म्हणाले, \'इमानची प्रकृती आता सुधारत आहे. तिच्या न्यूरॉलॉजिकल स्थितीची पाहाणी करण्यासाठी सीटी स्कॅन केले जाणार आहे. सायमा यासाठी वाद निर्माण करत आहे, कारण बहिणीला घऊन मायदेशी परत जाण्याची तिची आर्थिक परिस्थिती नाही.\'
- इमानवर उपचार सुरु झाल्यानंतर पहिले 15 दिवस सर्वकाही व्यवस्थित होते. मात्र जेव्हा इमानमध्ये सुधारणा होऊ लागली तेव्हा आम्ही सायमाला आपल्या बहिणीला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा तिने हे नाटक सुरु केले. 
- डॉ. लकडावाला म्हणाले, की इमानचे सीटी स्कॅन केले जाणार आहे तेव्हा कोणीही तेथे येऊन पाहू शकतो की तिच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली आहे आणि तिच्यात कसे बदल होत आहे. यामुळे सायमाच्या आरोपात किती तथ्य आहे, हेही तपासता येईल असेही लकडावाला म्हणाले. 
327 किलो वजन घटले 
- इस्त्रायल येथील रहिवासी 36 वर्षांची इमानचे दोन महिन्यात 327 किलो वजन कमी झाले आहे. आता ती 173 किलोंवर आली आहे. सोमवारी सैफी हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या तिच्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. ओबेसिटी सर्जन डॉ. लकडावाला म्हणाले, इमाननमध्ये चमकत्कारिक बदल होत असून तिची स्थिती सुधारत आहे. आमची आपेक्षा होती की सहा महिन्यांपर्यत तिचे 200 किलो वजन कमी करता येईल. वजन कमी होत असल्याने तिच्या प्रकृतीमध्ये आपोआप सुधारणा होत आहे. तिचे हार्ट, किडनी आणि लंग्स चांगल्यापद्धतीने काम करत आहे. तिचे वॉटर लेव्हलही अंडर कंट्रोल आहे. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...