आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात संतांच्या शिकवणींचा जागर, वारक-यांचा 'व्हॉट्सअॅप माझा सांगाती' उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साेशल मीडियामुळे तरुण पिढी बिघडत चालली अाहे असा अाराेप केला जात असला तरी हाच मीडिया सामाजिक प्रबाेधन व प्रगती घडवून अाणू शकताे असा विश्वास काही तरुण कीर्तनकारांना वाटत आहे. त्यांच्या या विश्वासातून ज्ञानेश्वरीचे अाॅनलाइन पारायण उपक्रम सुरू झाला आणि तो चांगलाच यशस्वी ठरला आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर अाता हरिनाम सप्ताहासाठी "व्हाॅट्सअॅप माझा सांगाती' असा एक नवा उपक्रम वारकरी सांप्रदायातील १०० तरूण मंडळींनी सुरू केला आहे.

महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यातील काही वारक-यांनी राेज सकाळी ठराविक वेळेला एकत्र जमून प्रत्येक जण एकामागून एक ज्ञानेश्वरीची एक अाेवी व्हाॅट्सअॅपवर पाेस्ट करण्यास सुरुवात केली होती. या मंडळींनी ज्ञानेश्वरीच्या सुमारे ९ हजार अाेव्या व गीतेचे श्लाेक तीन महिने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली होती. हा अाॅनलाइन पारायणाचा उपक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला. ओव्यांवरचे काही कीर्तनकारांचे विवेचन अाणि निरूपणही लोकांपर्यंत पोहाेचले. अखेर काही दिवसांपूर्वी अाळंदीत तीन दिवसांच्या समाराेप समारंभात शेवटच्या दहा अाेव्या पाेस्ट करून हा उपक्रम पूर्ण झाला. ज्ञानेश्वरी पारायणानंतर अन्य साधुसंतांची कवने, अभंग, विचार समाजापर्यंत नेऊन तरुणांचे प्रबाेधन करण्यासाठी व्हाॅट्सअॅपवरच हरिनाम सप्ताहाचे अायाेजन करण्यात येणार अाहे. या सप्ताहाचा पारायण साेहळा एकनाथ महाराज (पैठण), निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर), मुक्ताबाई महाराज (जळगाव) अशा अन्य संतांच्या जन्मठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

सन्मार्गासाठी 'सोशल' सदुपयोग
या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना श्यामसुंदर साेन्नर महाराज म्हणाले, सोशल मीडियाचा वापर करत धर्म-जाती-संस्कृती-भाषिक समूहात मोठ्या प्रमाणात समाजात तेढ वाढवली जात आहे. अशावेळी सामाजिक समता-बंधुता सांगणारी संतांची शिकवण लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. सामाजिक प्रबोधन, तरुणांना सन्मार्ग दाखवण्यासाठी या मीडियाचा वापर करण्याची गरज आहे.