आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मिथुनदा, सुनील शेट्टी, डिनो मारिया आणि अर्जुन रामपाल या अभिनेत्यांनी व्यवसायासाठी भले मोठे हॉटेल्स उघडले. यात आता बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खानची भर पडणार आहे. मात्र, सामाजिक जाण
असलेला सल्लू हॉटेल्समधून मिळणा-या पैशांचा उपयोग हा गरजू गरिबांसाठी करणार आहे.
सलमान म्हणाला, सुरुवातीला आम्ही मोठ्या शहरात हॉटेल्स आणि रुग्णालय सुरू करणार आहोत. याचा शुभारंभ मुंबई आणि पुणे या शहरातून करण्यात येणार आहे. हॉटेल्समधून जमा होणारा पैसा हा शहरातील गरजूंसाठी वापरण्यात येईल. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत. तसेच दुस-या टप्प्यात काही रुग्णालये स्थापन करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला. बॉलीवूडमध्ये सलमानची ओळख ही सर्वांचा मित्र आणि गरजू लोकांना मदत करणारा अशीच आहे. काही वर्षांपूर्वी त्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ‘बीइंग ह्युमन’ या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. नुकतेच याच नावाने मुंबईत एका कपड्याच्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या दुकानातून विक्री झालेल्या कपड्यांतील पैशांचा उपयोग हा गरजूंसाठी करण्यात येणार आहे. सल्लूच्या या दुकानाच्या शुभारंभप्रसंगी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यात आई सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सोहेल आणि आरबाज, वहिनी मलायका, सीमा खान, बहीण अल्विरा आणि भाऊजी अतुल अग्निहोत्री यांची उपस्थिती होती. या वेळी सर्वांनी सलमानच्या कार्याचे कौतुक केले.
भाऊजींसोबत पुन्हा चित्रपट
‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट केल्यानंतर सलमान पुन्हा एकदा भाऊजी अतुल अग्निहोत्रीसोबत एक अॅक्शन चित्रपट करत आहे. या वेळी अतुलने सांगितले की, आम्ही पुन्हा एक अॅक्शनपट करत आहोत. हा कोणत्याही चित्रपटाचा रिमेक नसून आम्ही एका नव्या कथेसोबत प्रेक्षकांसमोर येणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.