आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर अधिकारी एक जुलैपासून संपावर जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या वेतन समानतेसह अन्य महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकार उदासीन असल्याने विक्रीकर अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे संपाची नोटीस दिली आहे. आता जीएसटी लागू होण्याच्या तोंडावर विक्रीकर अधिकाऱ्यांनीही संपाची घोषणा केल्याने सरकारसमोरील अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

विक्रीकर अधिकारी संवर्गाची समकक्षता केंद्रातील अबकारी कर विभागातील अधिकाऱ्यांसमवेत ठरवून त्यांना अनुज्ञेय असलेली वेतनश्रेणी व ग्रेड-पे पूर्व पद्धतीने देणे, नवीन भरती आणि इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...