आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानला परदेशात जाण्याची सशर्त परवानगी, परतताच जमा करावा लागणार पासपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन केस प्रकरणात सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने परदेशात जाण्याची मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे. दुबईत २९ मे रोजी आयोजित "इंडो-अरब बॉलीवूड अवॉर्ड्स' या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सलमानने परवानगी मागितली होती.

मद्यधंुद अवस्थेत २००२ मध्ये भरधाव कारखाली एकास चिरडल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दोषी ठरवले होते. मात्र, उच्च न्यायालयाकडून त्यास याप्रकरणी जामीन देण्यात आलेला आहे. दरम्यान, त्याला परदेशी जाण्यासाठी प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, अशी अट या जामिनात टाकण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सलमानने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. दुबईमध्ये २७ ते ३० मेदरम्यान आयोजित एका सोहळ्यासाठी त्याला जायचे असल्याचे कारण यात देण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन एकसदस्यीय खंडपीठाच्या न्यायाधीश शालिनी फणसाळकर जोशी यांच्या पीठाने यावर मंगळवारी सुनावणी करत त्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली.
दुबईच्या भारतीय दूतावासात हजेरी
दरम्यान, परदेशात जाण्यासाठी सलमानला परवानगी मिळाली असली, तरी त्यातील सर्व अटी त्याला बिनशर्त पाळाव्या लागणार आहेत. त्यानुसार दुबईसाठी रवाना होण्यापूर्वी त्यास २ लाखांचा जातमुचलका भरावा लागेल. शिवाय दुबईतील त्याचे वास्तव्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक, ज्या विमानाने जाणार त्याचा तपशीलही न्यायालयास द्यावा लागेल. विशेष म्हणजे, वास्तव्याच्या कालावधीदरम्यान सलमानला दुबईतील भारतीय दूतावासात नियमित हजेरी लावावी लागणार आहे. दुबईवरून परत येताच बारा तासांच्या आत आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे सुपूर्द करावा लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...