आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण, १३ वर्षांनंतर संशयाचा लाभ, सलमान खान निर्दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानची १३ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी ती रद्द केली. अपघाताच्या वेळी सलमान कार चालवत होता आणि तो दारू प्यायला होता, हे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकला नाही, असे न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी हा निवाडा देताना म्हटले आहे.

न्यायमूर्तींनी सलमानच्या वकिलांना त्याला कोर्टात बोलावण्यास सांगितले. दुपारी दीड वाजता सलमान कोर्टात आला. त्यानंतर खच्चून भरलेल्या कोर्टरूममध्ये न्या. जोशी आले व फक्त एका मिनिटात निकाल ऐकवला. केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. म्हणून सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून सलमानला निर्दोष मुक्त करण्यात येत आहे, असे न्या. जोशी म्हणाले. दरम्यान, हा निकाल पाहूनच पुढील निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मीडियाने तयार केलेल्या हवेवर निकाल देता येत नाही : न्यायमूर्ती
फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध करू शकला नाही. कोणताही संशय नसावा अशा तऱ्हेने दोष सिद्ध व्हायला हवा. संशयाच्या पलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध होताे हे पाहणे कोर्टाचे कर्तव्य आहे. कोर्ट जनतेची भावना व मीडियाने निर्माण केलेल्या वातावरणावर निकाल देत नाही
-न्या. ए.आर. जोशी, मुंबई हायकोर्ट
पुढील स्‍लाइडवर वाचा, सत्र न्यायालयात प्रत्येक आधार हायकोर्टात निराधार