आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान म्हणाले - मुस्लिम असल्यामुळे सलमान टीकेचे लक्ष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलीम खान आणि सलमान खान - Divya Marathi
सलीम खान आणि सलमान खान
मुबंई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमान मुस्लिम आणि सेलिब्रिटी असल्यामुळे त्याच्यावर टीका झाली असे म्हटले आहे. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे ट्विट सलमानने केले होते. त्यानंतर त्याने ते मागे देखील घेतले मात्र, याकूबच्या फाशीनंतरही हा वाद संपलेला नाही.

प्रसिद्ध पटकथाकार राहिलेले सलीम खान मुलाखतीत एका भाजप नेत्यावर आरोप केला. ते म्हणाले, मुंबईतील भाजपचे स्थानिक नेते आणि आमदार आशीष शेलार यांनी संधी मिळेल तेव्हा सलमानला मारणार असल्याची धमकी दिली आहे. सलमानच्या ट्विट नंतर शिवसेना आणि भाजपने त्याच्याविरोधात आंदोलन केले होते.

सलीम यांनी मुलगा सलमान च्या ट्विटला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी ते ट्विट गैरलागू असल्याचे म्हटले. सलमानने याकूबबद्दल 14 ट्विट केले होते. त्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती.

धर्माचा दहशतवादाशी संबंध नाही
जावेद अख्तर यांच्यासोबत शोले आणि दिवार हे सुपरहिट चित्रपटांची पटकथा लिहिणारे सलीम खान म्हणाले, धर्माचा आणि दहशतवादाचा काही संबंध नाही. मुस्लिमांना खरा इस्लाम काय आहे हे सांगण्याची गरज आहे.