आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीखाली आलेली व्यक्ती जिवंत होती; क्रेनने काढताना मृत्यू झाल्याचा सलमानचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अॅन्ड रनप्रकरणात अपघाताच्या दि्वशी अभिनेता सलमान खानच्या गाडीखाली आलेली व्यक्ती जिवंत होती. मात्र, त्यानंतर गाडी हलवताना क्रेनच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला, असा दावा सलमानच्या वकिलाने शुक्रवारी सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान केला.

हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी सलमान खान त्याचे वडील सलीम खान आई सलमा आणि बहीण अल्विरा हे न्यायालयात हजर होते. याआधी झालेल्या सुनावणीत ‘अपघातानंतर पाेलिसांकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात अालेले रक्ताचे नमुने सलमानचे नव्हतेच, असा युक्तिवाद त्याचे वकील श्रीकांत शिवडे यांनी केला होता. तसेच ज्या प्रयाेगशाळेत हे रक्त तपासण्यात अाले ती मान्यताप्राप्त नसल्याचेही म्हटले अाहे. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू, तर चाैघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल अाहे.