आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्रसाठी पर्याय सलमान नाहीच, दबंग खानचा भूमिकेस साफ नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या भूमिकेत स्वत: धर्मेंद्रच शोभून दिसतील,’ असे सांगत बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्यांची भूमिका साकारण्यास विनम्रपणे नकार दिला आहे.
आपल्या जीवनावर आधारित चित्रपटात सलमान हा आपली योग्य भूमिका वठवू शकेल, असे धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे सलमान त्यांचे पात्र साकारेल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. मात्र, या शक्यतेला खुद्द सलमाननेच पूर्णविराम दिला अाहे. या विषयासह अनेक अन्य बाबींवरही सलमान खानने "दिव्य मराठी नेटवर्क’शी केलेली खास बातचीत.

चित्रपट निर्मितीस खूप वेळ लागतो?
- सलमान : प्रत्यक्षात पडद्यावर चित्रपटाची लांबी कमी झाली आहे. त्यामुळे एखादा चित्रपट तयार होण्यासाठी अजूनही दीड-दोन वर्षे का लागतात याचे मला आश्चर्य वाटते.

फावल्या वेळेत काय करतोस?
- सलमान : फावल्या वेळेत माझे जुने चित्रपट पाहतो. नुकताच "सनम बेवफा' टीव्हीवर पाहिला. तत्कालीन चित्रीकरणावेळच्या आठवणी किंवा लोकेशन आता लक्षात राहत नाहीत. ज्या घटना आठवतात त्याचे हसू येते.
धर्मेंद्र यांची भूमिका साकारणार काय?
- सलमान : धरमजींच्या जीवनपटात ते स्वत:च त्यांच्या भूमिकेत शोभून दिसतील. मी त्यांची भूमिका साकारायला गेलो तर त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र, मला जोरदार झटका बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, धर्मेंद्र साकारणे हे फक्त त्यांनाच शक्य आहे, मला नाही.

स्वत:च्या भूमिकेत कोण आवडेल?
- सलमान : माझ्या जीवनावर चित्रपट बनवण्याची कोणीही हिंमत करणार नाही. कोणी असेल तर मला सांगा. कारण, माझा जीवनपट बनवून कोणाला झटका बसवून घ्यायला आवडेल? आणि माझी भूमिका करणारा नक्कीच जोरदार आपटी खाईल.
सलमान आणि मी चांगले मित्र बनलोय : शाहरुख
मुंबई - पुढच्या वर्षी माझा "रईस' आणि सलमानचा "सुलतान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दोन्हीही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असले तरी आमच्यात कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसेल. व्यावसायिक गोष्टी वेगळ्या आहेत. मात्र, मी आणि सलमान चांगले मित्र बनलो असल्याचे शाहरुख खानने म्हटले आहे. सलमान- शाहरुख द्वंद्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र, शाहरुखने नातेसंबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते.