आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात जा असे सांगणाऱ्याला सलमानचे वडील म्हणाले, मी मुळचा अफगाणिस्तानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगार याकूब मेमन याला फाशी देण्याला सलमान खानने विरोध केला होता. त्यावरुन सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर अद्यापही प्रखर टीका होत आहे. त्यावर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सलमानचे वडील सलिम खान म्हणाले, की मी मुळचा अफगाणिस्तानी आहे. मी पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही. आता माझ्या घरासमोर आंदोलनकारी हे म्हणणार नाहीत, की पाकिस्तानला जा. त्यांनी विनंती केली तर मी अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतो. मी अजूनही अफगाणिस्तानशी जुळलेला आहे.
सलिम खान यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या मंचावर होते. विशेष म्हणजे भाजप आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याही घरासमोर निदर्शने केली होती.
विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते प्रविण तोगडीया यांनी म्हटले होते, की याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे.
जरा आराम मिळाला की लिहेन...
सलिम खान यांना एका व्यक्तीने विचारले, की सध्या तुम्ही लिहित का नाही? त्यावर सलिम म्हणाले, की लोक मला विचारतात आजकाल लिहित का नाही. तेव्हा मी सांगतो, की जरा आराम मिळाला की लिहेन. सध्या अनेक केसेस सुरु आहेत. घरात समस्या आहेत. त्यामुळे निवांत वेळ मिळत नाही.