आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्याची मुंबई हायकोर्टाची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने दिली आहे. एका कार्यक्रमासाठी दुबईला जाण्याची परवानगी मिळावी अशी विनंती सलमान खानने हायकोर्टाकडे केली होती.
मागील पंधरवड्यात सलमान खानला हिट अॅंड रन केसप्रकरणात सत्र न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमान खानने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय स्थगित करीत पुढील अंतिम सुनावणीपर्यंत त्याला जामीन मंजूर केला होता. त्याचवेळी त्याला परदेशात जाण्यास परवानगी नाकारली होती. सलमान खानचा पासपोर्ट हायकोर्टाने काढून घेतला होता. मात्र, सलमान खानने नव्याने अर्ज दाखल केला व आपल्याला दुबईला व्यावसायिक कामासाठी जावे लागत असल्याचे कारण दिले.
मागील आठवड्यात सलमान खानने सत्र न्यायालयात नव्याने जामीन मंजूर करून घेतला होता. त्याची व्यवस्थापक शेट्टी हिने स्वत:ला जामीन करून सत्र न्यायालयात बॉंड भरला होता. सलमान खानची हिट अँड रन प्रकरणाची पुढील सुनावणी जून व जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. तसेच पुढील दोन-तीन महिन्यात या केसची सुनावणी पूर्ण करण्याचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले आहेत. दरम्यान, सलमान खानवर बॉलिवूडमधील दिग्दर्शकांनी 200 कोटींपेक्षा जास्त पैसे गुंतवले आहेत.
भाईजान व आणखी एक चित्रपटाचे शुटिंग जवळपास संपले आहे. काही शुटिंगचे शॉट राहिले आहेत. त्यासाठी तो दुबईला जाणार असल्याचे कळते आहे. सलमान खानला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तो काश्मिरात भाईजानच्या शुटिंगसाठी गेला होता. काही दिवस तेथे शुटिंग करून तो नुकताच मुंबईत परतला आहे. आता उर्वरित शुटिंग व खासगी कार्यक्रमाचे निमित्त सांगून सलमान दुबईची वारी करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...