आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर हृदयरोगी बालकांच्या उपचाराचा खर्च सलमान करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने एका विशेष घोषणेसह यंदाची ईद साजरी केली. त्याची ‘बिइंग ह्युमन’ ही संस्था 100 हृदयरोगी बालकांच्या उपचारांच्या खर्चाचा भार उचलेल, असे त्याने ट्विटरवर जाहीर केले.
हृदयविकाराने ग्रस्त बालकांविषयी संस्थेला माहिती दिल्यास त्यांच्यावर उपचार करण्यास आपण सर्वतोपरी मदत करू. मात्र, लोकांनी याचा गैरफायदा घेऊ नये तसेच आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांची सर्व माहिती मला ट्विटर किंवा फेसबुकवर द्यावी, असेही सलमानने स्पष्ट केले आहे.
‘किक’ कडून 100 कोटींची ईद
सलमानचा ‘किक’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसांत विक्रमी 83 कोटींची कमाई करणार्‍या या चित्रपटाने ईदच्या दिवशी त्याने 100 कोटींचा गल्ला सहज पार केला आहे.
देशातील तब्बल 5 हजार चित्रपटगृहांत हा चित्रपट झळकला आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित ‘किक’मध्ये सलमानव्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.