आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान प्रकरण : कोण सुटले, कोणी सोडवले, कोणाची पकड झाली ढिली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या मे महिन्यानंतर सत्र न्यायालयातून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. १३ वर्षांमध्ये यात बरीच कायदेशीर गुंतागुंत करण्यात आली होती. यात तीन जणांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. प्रथम, अनेक प्रकरणांत यशस्वी ठरलेले सलमानविरुद्ध याचिका दाखल करणारे वकील संदीप शिंदे. दुसरे, मुंबईत वकिली केलेल्या व अनेक अपघातांची प्रकरणे हाताळलेले न्या. ए. आर. जोशी आणि तिसरे, सलमानचे वकील अमित देसाई. या तिन्ही मान्यवरांविषयी जाणून घ्या...
अमित देसाई (सलमानचे वकील) -
यांच्या युक्तिवादातून बदलली न्यायालयाची धारणा : गोवा पोलिसांनी २०११ मध्ये एका वकिलास नोटीस जारी केली होती. त्यात चार सुनावण्यांसाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी गोवा सरकारवर ३.७५ लाख रुपयांचे बिल आकारण्यात आले होते. हे प्रकरण २६,२७ आणि २८ नोव्हेंबर २००८ चे आहे, ज्यात गोवा सरकारकडून गोव्यातच मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याबाबतची बाब एक अन्य वकील एरेस रॉड्रिग्ज यांनी तक्रारीतून समोर आणली होती. तेव्हा गोवा पाेलिसांनी संबंधित वकिलाला नोटीस जारी केली होती. हे वकील अन्य कोणी नव्हे तर अमित देसाईच होते. मात्र, २०१२ मध्ये देसाई यांच्याविरुद्धच्या सर्व तक्रारी फेटाळण्यात आल्या आणि त्यांच्या बाजूने निकाल सुनावण्यात आला.देसाई २० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्यांनीच सलमानप्रकरणी सरकारी पक्षाची बाजू कमकुवत करत सलमान दारू प्यायल्याची बाब खोटी ठरवली आणि कारचे टायर फुटल्याची कथा जोरकसपणे मांडली. सात महिन्यांपूर्वी सत्र न्यायालयाने सलमान कार चालवत होता, हे मान्य केले होते. मात्र, देसाई यांनी सलमान कार चालवत नव्हता हे सिद्ध केले. यासोबत तो नशेतही नव्हता हे सिद्ध केले. सलमान अपघातानंतर पळून गेला होता, मात्र तो गर्दीमुळे पळून गेल्याचे देसाई यांनी सिद्ध केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सरकारी वकील संदीप शिंदे यांच्‍या विषयी...