मुंबई -'हिट अँड रन'प्रकरणी बॉलीवूड अभिनेता
सलमान खानला मुंबई सेशन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. बुधावारी दुपारी न्यायाधीश डी. डब्ल्यू . देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे. त्यानंतर हायकोर्टाने सलमानाला दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सेशन कोर्टाच्या निर्णयानंतर सलमानच्या वकीलांना बॉम्बे हायकोर्टात जामीनासाठी अर्ज सादर केला. त्यावर तातडीने सुनावणी करुन सलमानला दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे. त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
13 वर्षांपूर्वीच्या 'हिट अँड रन' प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. कोर्ट परिसरातच पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले असून आर्थर रोड तुरुंगात त्याची रवानगी होण्याचीही शक्यता आहे.
LIVE UPDATE
7.50PM: सलमान घरी पोहोचला.
7.30PM: कारमध्ये बसून सलमान सेशन कोर्टातून घराकडे झाला रवाना.
7.10PM: सलमान सेशन कोर्टाच्या आवारात दाखल झाला.
6.50PM: पोलिसांच्या ताब्यातून सलमान सुटला.
6.35PM: देशपांडे यांना हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत सोपविण्यात आली.
6.00PM: सेशन कोर्टाचे न्यायाधीश देशपांडे यांनी अधिक वेळ थांबण्याची तयारी दर्शवली
5.20PM: प्रत सादर करण्यास 5.45 वाजेपर्यंत मुदत
5.00PM: सेशन कोर्टात प्रत सादर करण्यासाठी सलमानच्या नातेवाइकांची धावपळ सुरु
4:50PM: आमदार बाबा सिद्दीकी, सलमानची बहीण कोर्टाची प्रत घेऊन सेशन कोर्टातून पळत सुटले
4.35PM : सलमानला हायकोर्टाचा दिलासा, दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
3.30PM: हायकोर्टाने सुनावणीची वेळ दुपार चार वाजता निश्चित केली होती.
3.00 PM: सलमानच्या जामिनासाठी वकीलांना हायकोर्टात अर्ज केला.
2.02 PM: सलमानच्या ड्रायव्हरची साक्ष खोटी होती, सरकारी वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया
1.55- सलमानला आर्थर रोड जेलमध्ये नेण्यापूर्वी जेजे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेले
1.50PM: 5 वर्षांचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड, 500 रुपये दंड मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत
1.45PM: 10 मे पासून हायकोर्टाला सुट्टी असल्यामुळे जामीन मिळविण्यासाठी सलमानकडे फक्त तीन दिवसांचा अवधी
1.35PM: कोर्टाबाहेर पोलिसांची गाडी आली, ऑर्थर रोड जेलमध्ये नेणार
1.30PM: ऑर्थर रोड जेलमध्ये सलमानची रवानगी होणार
1.20 PM: सलमानला फुटला घाम, मागितले पाणी
1.10 PM: अभिनेत्री प्रीती झिंटा आणि सोनाक्षी सिन्हा सलमानच्या घरी पोहोचल्या
12.55PM: सलमानला दंडा आकारा,शिक्षा कमी करा,सलमानच्या वकिलांची मागणी
12:31 PM: युक्तिवाद संपला, कोर्टाने 1.10 वाजता निकाल देणार असल्याचे सांगितले.
12:30 PM:सरकारी वकील म्हणाले, सलमानला जास्तीत जास्त म्हणजे 10 वर्षांची शिक्षा व्हावी.
12:25 PM: कोर्टात सलमानच्या वकिलांचा युक्तिवाद संपला.
12:22 PM: कोर्टात वकील म्हणाले, सलमान आजारी आहे, त्याला तुरुंगात पाठवले जात असेल तर उपचारासाठी काही काळ सवलत द्यायला हवी. मात्र सलमानने वकिलाला आजारपणाबाबत बोलण्यापासून थांबवले.
12:21 PM सलमान मोठा अभिनेता आहे, त्यानं देशाचं नाव उंचावलं आहे... त्याला शिक्षा देताना याचा विचार व्हावा... सलमानच्या वकिलांचा युक्तिवाद...
12:20 PM अपघाताची घटना १२ वर्षांपूर्वीची आहे... सलमान आता बदलला आहे... तो समाजकार्यात सक्रीय आहे... 'बिइंग ह्युमन'च्या माध्यमातून तो गोरगरीबांसाठी काम करतो आहे... सलमानच्या वकिलांचा दावा...
12:19 PM सलमान आजारी आहे; त्याला तुरुंगात ठेवल्यास त्याच्या उपचाराची व्यवस्था करावी... सलमानच्या वकिलाची मागणी...
12:17 PM सलमानला तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा द्या... सलमानच्या वकिलांची मागणी...
11.32 AM: सलमानचा भाऊ सोहेल खान घरी परतला. काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकीबरोबर परतला घरी.
11.15 AM:
सलमान खान कोर्टात घामाघूम, सर्व नातेवाईक चिंताक्रांत
11.10 AM: कोर्ट म्हणाले सर्व आरोपात दोषी, तुमचे म्हणणे काय ?
10:04 AM: कोर्टाबाहेर सलमान खानच्या विरोधात तमिळ संघटनांचे आंदोलन. कडक शिक्षा देणयाची मागणी. श्रीलंकेत प्रचार केल्याने नाराज आहेत तमिळ संघटना.
9: 47 AM: सलीम खान, सलमा खान आणि अरबाज खानही वेगवेगळ्या गाड्यांत कोर्टाकडे रवाना.
9: 45 AM: वडील सलीम खान आणि आई सलमा यांची गळाभेट घेऊन
आपल्या गाडीत वसून सलमान कोर्टाकडे रवाना.
9: 43 AM: वडील सलीम आणि भाऊ अरबाज-सोहेल खानसहत कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर सलमान खान त्याच्यास गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर आला.
9: 00 AM : सलमानच्या खटल्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. न्यायालयात केवळ वकील, कर्मचारी, मीडिया प्रतिनिधींनाच परवानगी.
दुसरीकडे, कोर्टात खोटी साक्ष दिल्या मुळे सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशोक सिंहवरही खटला चालणार आहे. सलमानला जे.जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हायकोर्टाला 10 मे पासून सुट्टी असल्यामुळे जामीन मिळविण्यासाठी सलमानकडे फक्त तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
मुंबई सेशन कोर्टात बुधवारी सकाळी 11 वाजता झालेल्या सुनावणीत न्यायाधिश डी.डब्ल्यु. देशपांडे यांनी सलमानला सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी दोषी ठरवले. नंतर दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. यापूर्वी त्याच्या शिक्षेच्या निर्णयासंदर्भात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला. दरम्यान, सलमानला कोर्टातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सलमानला पाच वर्षे कारावास...
सलमानला कोर्टाने पाच वर्षांचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड तसेच मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत 500 रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
कोर्टाचे कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायाधीश डी. डब्ल्यू देशपांडे यांनी सलमानला तुमच्यावरील सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे सांगत तुमचे म्हणणे काय असे विचारले. त्यानंतर त्याने वकीलाकडे पाहिले. कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते, असे सांगितल्यानंतर वकील श्रीकांत शिंदे यांनी त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद केला. कोर्टाने सलमानाला दोषी ठरविल्यानंतर कोर्ट रुममध्येच त्याला रडू कोसळले. तो घामाघूम झाला. त्यावेळी त्याची बहीण अर्पिताही ओक्साबोक्सी रडू लागली. त्याच्या आईची प्रकृती खालवली आहे.