मुंबई - बॉलिवूडचा दबंग स्टार
सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात आज (बुधवार) निकाल आला आहे. सदोष मनुष्यवधाच्या या प्रकरणात सलमानला दोषी ठरवत त्याला 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील सेशन जज डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी आज निकालपत्राचे वाचन केले. त्यांनी सलमानला सकाळी 11.15 पर्यंत कोर्टात हजर राहाण्याचे आदेश दिले होते.
हे प्रकरण हायप्रोफाइल असल्यामुळे कोर्ट परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कोर्टात फक्त वकील, कोर्ट कर्मचारी आणि माध्यमांच्या प्रतिनीधींनाच उपस्थित राहाण्याची परवानगी दिली. आजच्या निर्णयावर
सलमान खानचेच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीचीही नजर होती. कारण सलमानवर इंडस्ट्रीत जवळपास 200 कोटी रुपये लागले आहेत. हे त्याच्या आगामी चित्रपटांचे बजेट आहे.
13 वर्षांपूर्वीचे आहे प्रकरण
हिट अँड रन प्रकरण 28 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईतील वांद्रे येथील एका बेकरीसमोरील फुटपाथवर घडले होते. फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांवर सलमानची टोयोटा लँड क्रुजर गाडी चढली होती. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आणि चार जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर बेजाबदारपणे गाडी चालवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अटक करण्यात आली आणि पोलिस स्टेशनमधून त्याला जामीन मिळाला होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सलमानने बारमध्ये काय ऑर्डर केले होते..