मुंबई - अभिनेता
सलमान खानचा वकील आजारी असल्याने हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी 9ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कागदपत्रे गहाळ झाल्याने यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
सरकारी वकील प्रदीप घरात यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, सलमानचे वकील श्रीकांत शिवडे आजारी आहेत. त्यामुळे सुनावणीसाठी पुढील तारीख द्यावी. त्यावर न्यायालयाने सुनावणीसाठी 9 ऑक्टोबर तारीख दिली.