आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅलिस्टर परेरा खटल्यातील निकालाच्या आधारे कोर्टाने सलमानला सुनावली शिक्षा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खान हिट अॅंड रन खटल्यात दोषी आढळला असून त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. कोर्टाने सलमानला कलम 304 (अ), 279 337 आणि 338 कलमान्वये अंतर्गत दोषी धरत शिक्षा सुनावली आहे. या कलमानुसार सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधिश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. सलमान खानला शिक्षा सुनावताना अॅलिस्टर परेरा खटल्याच्या निकालाचा आधार घेऊन निर्णय घेतला गेला आहे.
सलमानचे समाजकार्य पाहून कमीत कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला होता तर सरकारी वकिलांनी 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर न्यायाधिश देशपांडे यांनी दुपारी दीडच्या सुमारास सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
12 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबईतील कार्टर रोडवर अॅलिस्टर अँथनी परेरा या तरुणाने दारुच्या नशेत भरधाव कार चालवत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 7 बांधकाम मजुरांना कारखाली चिरडले होते. यात 8 जण जखमी झाले होते. या खटल्यात अॅलिस्टर परेरा या तरुणाला तीन वर्षाची शिक्षा सुनविण्यात आली होती. आजच्या सलमान खानच्या खटल्याच्या निकाल दिल्यानंतर झालेल्या युक्तीवादात न्यायाधिश देशपांडे यांनी परेरा खटल्याचा आधार घेऊन शिक्षा सुनावली आहे. परेराच्या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. त्यावेळी 8 जण जखमी झाले होते. मात्र, सलमान खानच्या खटला प्रकरणात 1 जणाचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते. त्यामुळे परेरापेक्षा सलमान खानला दोन वर्षाची जास्तीची शिक्षा सुनावली गेली आहे.
सलमानला कोणत्या कोणत्या आरोपांत दोषी धरले आहे...
- सलमान स्वत: मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवित होता
- सलमान त्या रात्री दारुच्या नशेत होता
- सलमानकडे त्या वेळी ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते.
वरील आरोपांत दोषी ठरवल्याने सलमानला या कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली
कलम 304 (अ) - दोन वर्ष तुरुंगवास
कलम 279 - सहा महिने तुरुंगवास
कलम 337 - सहा महिने तुरुंगवास
कलम 338 - दोन वर्ष तुरुंगवास