आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Reached Mumbai Court Verdict Day In Hit And Run Case

सलमान सेशन कोर्टातून घराकडे रवाना, हायकोर्ट निर्णयाची प्रत जजना मिळाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला सेशन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. बुधावारी दुपारी न्यायाधीश डी. डब्ल्यू . देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे. त्यानंतर सलमानच्या वतीने त्याच्या वकीलांनी जामीनासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज सादर केला. त्यावर तातडीने सुनावणी करुन सलमानला तुर्तास दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे. त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, हायकोर्टाच्या निर्णयाची कॉपी मिळाल्यावर सलमानला सेशन कोर्टातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. सलमान सध्या त्याच्या घराकडे रवाना झाला आहे.

सव्वा सहा वाजता सेशन कोर्टात पोहोचली प्रत
हायकोर्टातून जामीन मंजूर झालेल्या निर्णयाची सर्टीफाइड कॉपी सेशन कोर्टात सादर झाल्यानंतरच सलमानला आज घरी जाता येणार आहे, सेशन कोर्टाने यासाठी पावणे सहा वाजेपर्यंतची वेळ दिली होती.मात्र, कोर्टाने दिलेल्या वेळेच्या अर्धा तास उशीरा प्रत कोर्टात पोहोचली.

हायकोर्टातून मिळालेली सर्टीफाइड कॉपी सेशन कोर्टात सादर करण्यासाठी सलमानची बहीण आणि आमदार बाबा सिद्दीकींची कमालीची धावपळ उडाली. हायकोर्ट आणि सेशन कोर्टमध्ये 500 मीटरचे अंतर आहे.
निर्णयाची प्रत घेऊन बाबा सिद्दीकींची धावपळ
हायकोर्टात न्यायाधीश अभय ठिपसे यांच्या पीठापुढे अॅड. हरीश साळवे यांनी सलमानच्या जामीनासाठी अर्ज सादर केला आणि सेशन कोर्टाच्या निकाल आम्ही अजून वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर आताच युक्तीवाद करता येणार नाही. त्यासाठी आम्हाला दोन दिवसांची मुदत मिळावी. आजपर्यंत सलमान खान जामीनावरच बाहेर आहे आणखी दोन दिवस त्यांना जामीन मंजूर करण्यास काही हरकत नाही. यावर कोर्टाने जामीन हा तुमचा अधिकार आहे असे सांगत दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, शुक्रवारी नव्या बाँडसह अर्ज करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, हायकोर्टातून जामीन मंजूर झाल्याची माहिती सलमानच्या वकीलांनी सेशन कोर्टाला कळवली तेव्हा त्यांनी निर्णयाची प्रत सादर करण्यास सांगितले. त्यावर वकीलांनी अजून प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावर सेशन कोर्टाने 5.45 वाजतापर्यंत मी तुमची वाट पाहातो तो पर्यत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत सादर करा असे आदेश दिले. त्यामुळे हायकोर्टात उपस्थित असलेले आमदार बाबा सिद्दीकी आणि सलमानची बहीण धावत कोर्टाबाहेर आले आणि तातडीने कारच्या दिशेने धावत गेले.
सलमानच्या वतीने ज्येष्ट विधिज्ञ हरीश साळवे यांनी हायकोर्टात बाजू मांडली. 10 मे पर्यंत त्याला जामीन मिळाला नसता तर, पुढे अनेक दिवस त्याला तुरुंगात राहावे लागण्याची शक्यता होती. कारण 10 मे पासून 7 जून पर्यंत कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. सलमानला आता दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे. 9 तारखेला त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सलमान खानच्या वकीलांसह त्याची बहीण अर्पिता दुपारी तीन वाजताच्या सुमारास हायकोर्टात पोहोचले. साडे चार वाजता सलमानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. जामीनासाठी सलमानकडे फक्त तीन दिवस आहे. त्यानंतर कोर्टाला सुट्या लागणार आहेत.

चित्रपटांचे प्रदर्शन लांबवण्याची शक्यता
सलमान खानचे दोन आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यावर गुतंवणूकदारांनी 200 कोटी रुपये लावले आहेत. त्यात 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रमे रतन धन पायो' हे चित्रपट आहेत. सलमान जर तुरुंगात गेला तर या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
करण जोहरचा शुद्धी हा चित्रपट अंडर प्रोडक्शन आहे. या चित्रपटात सलमानसोबत संजय दत्त आहे. याशिवाय बोनी कपूर, अरजाब खान आणि अतुल अग्निहोत्री यांच्यासोबतही सलमान चित्रपट करत आहे.
कमाल खान देखील कारमध्ये होता, मात्र साक्षीदार झाला नाही
हिट अँड रन केसमध्ये सलमान खान दोषी ठरला आहे, मात्र त्या रात्री त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे गायक आणि अभिनेता कमाल खान. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सलमान आणि कमाल खान अपघातानंतर घटनास्थळाहून पळून गेले. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर सलमानला अटक करण्यात आली मात्र पोलिसांना कमाल खान सापडला नाही. या प्रकरणात कमालचा जबाब महत्त्वाचा ठरू शकला असता. मात्र, एकदाच पोलिसांकडे साक्ष नोंदवल्यानंतर कमाल परत कधीही दिसला नाही. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, कमालकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे आणि या घटनेनंतर तो आपल्या देशात परत गेला.
कमालने सलमानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटात ‘ओ-ओ जाने जाना’ हे गाणे गायले होते. या गाण्यामुळेच तो नावारुपास आला होता. त्यानंतर एका चित्रपटात त्याने अभिनय देखील केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घरातून कोर्टाकडे निघत असताना सलमान आणि कुटुंबीय