आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान आणणार स्वस्तातील मल्टिप्लेक्स चेन, प्रारंभी 300 कोटींची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "बजरंगी भाईजान' सलमान खान फिल्म्सचा पहिला चित्रपट आहे. निर्माता झाल्यानंतर तो आता स्वस्त तिकीट देणारे मल्टिप्लेक्स सुरू करत आहे. सलमान खान व्हेंचर्सअंतर्गत "जनता मल्टिप्लेक्स चेन' प्रोजेक्ट आणत आहे. फोर्ब्ज २०१५ च्या श्रीमंतांच्या यादीत ७१ व्या क्रमांकावरील सलमानने तिकीट दर कमी करणे आणि सामान्य प्रेक्षकांनी मल्टिप्लेक्सपर्यंत आणण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.

सलमानशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील चित्रपटांच्या संस्कृतीचा अभ्यास करत आहे. यानंतरच त्याने हा निर्णय घेतला आहे. दक्षिण भारतात तिकीट दर माफक असतात. एवढेच नव्हे, तर ३० ते ३५ हजार लोकसंख्येच्या लहान गाव-शहरातही चित्रपटगृह असते. संपूर्ण भारतात जवळपास १२ हजार चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्ससह) आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळमध्ये ४० टक्के म्हणजे ५ हजार चित्रपटगृहे आहेत. देशातील उर्वरित भागात ७ हजार चित्रपटगृहे आहेत.

देशात महागडी तिकिटे सहन करू शकणारे १० टक्के लोक आहेत. मोठे चित्रपट धूम ३, पीके किंवा चेन्नई एक्स्प्रेस प्रदर्शनानंतरच्या सोमवारीही तिकीट दर कमी झाला नव्हता. सलमानने "जय हो'च्या प्रदर्शनानंतर सोमवारपासून तिकीट दर सामान्य केले होते. या व्यवसायाची बाजारपेठ समजून घेण्यासाठी त्याने जनता मल्टिप्लेक्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. सलमान स्वत: या प्रोजेक्टमध्ये 300 कोटींची गुंतवणूक करत असून एक मोठी कॉर्पोरेट कंपनीही त्याच्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली आहे. यासंबंधीची घोषणा आणि स्थापन होणाऱ्या शहरांची माहिती आगामी दोन महिन्यांत केली जाईल. सलमान खान व्हेंचर्सअंतर्गत सलमान असे अनेक प्रोजेक्ट सुरू करत आहे.