आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानला याकूब मेमन वाटताे ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/दिल्ली - अभिनेता सलमान खान पुन्हा वादात सापडला आहे. या वेळी त्याने याकूब मेमन निरपराध असल्याची टिप्पणी केली. सलमानने शनिवारी रात्री एक ते दोनच्या दरम्यान १४ ट्विट करून याकूबला फाशी देणे चुकीचे असल्याचे म्हटले.

सलमानने लिहिले-‘टायगरऐवजी भाईला फाशी दिली जात आहे. अरे, टायगर कुठे आहे? भारतात टायगरचीच तर कमतरता आहे. टायगरला आणा. टायगर तुमचा भाऊ काही दिवसांत फासावर जाणार आहे. काही वक्तव्य? काही पत्ता? तुम्ही कुठे आहात, काहीतरी सांगा ना. भाऊ असा असावा? म्हणजे, याकूब मेमन. निरपराधाची हत्या म्हणजे मानवतेचा खूनच. टायगरला आणून फाशी द्या. दाखवण्यासाठी त्याच्या भावाला फाशी नको. हा टायगर म्हणजे मांजर नव्हे आणि आम्ही एका मांजरीला पकडू शकत नाही. शरीफ साहेब, जर तो (टायगर) तुमच्या देशात असेल तर कृपया सांगा. भाईला फाशी देऊ नका.’ रविवारी सकाळीच या ट्विट्सवरून गदारोळ झाला. शिवसेना-भाजपने त्याला तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना समर्थकांनी काही शहरांत सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सिनेमागृहांत दाखवण्यास मज्जाव केला. भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, ‘सलमानने न्यायालयाचा अवमान केला आहे. माफी मागितली नाही तर हा मुद्दा संसदेत उपस्थित करू.’ अखेर पिता सलीम खान यांनी सलमानचा बचाव केला. ते म्हणाले,‘सलमानचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका.’ १४ तासांनंतर सलमानने माफी मागितली आणि ट्विट हटवले. दरम्यान, नागपुरात याकूबला फाशी देण्याची तयारी सुरू आहे.

पुढे वाचा, १४ तासांनी उपरती, वडिलांनी सांगितल्याने टि्वट मागे घेतले