मुंबई- सन 2002 मधील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी मुंबई सेशन कोर्टाने बॉलीवूड अभिनेता
सलमान खानला दोषी ठरवले असून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु,
सलमान खानला शिक्षा व्हावी, अशी आमची मुळीच अपेक्षा नसल्याचे एका पीडित व्यक्तीने म्हटले आहे. अब्दुल शेख असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे. 28 सप्टेंबर, 2002 च्या रात्री वांद्रे येथील अमेरिकन लॉन्ड्रीसमोर झालेल्या दुर्घटनेत अब्दुल शेख याने एक पाय गमावला आहे.
अब्दुल शेखने सांगितले की, मी दुर्घटनेत एक पाय गमावला आहे. माझ्याप्रमाणे आणखी चार लोक गंभीर जखमी झाले होते तर एकाचा मृत्यु झाला होता. सलमानला काय शिक्षा होईल हे माहीत नाही. याबाबत कोर्ट निर्णय देणार आहे. परंतु, सलामानला शिक्षा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. सलमान कोर्टाने शिक्षा सुनावली तरी आमचे मागील 13 वर्षे थोडीच परत मिळणार आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संपूर्ण प्रकरण आणि काय म्हणाला होता सलमान...